शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

८० बसेसमध्ये वायफाय कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:12 IST

राज्य परिवहन महामंडळाने खाजगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी एसटीमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय देण्याचा निर्णय घेतला होता़ त्याअंतर्गत नांदेड विभागातील जवळपास ५२० बसेसमध्ये ही सुविधा देण्यात येणार होती़ त्यामध्ये नांदेड आगारातील ८० बसेसमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून टप्प्याटप्याने इतर बसेसमध्येही वायफाय मिळणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: राज्य परिवहन महामंडळाने खाजगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी एसटीमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय देण्याचा निर्णय घेतला होता़ त्याअंतर्गत नांदेड विभागातील जवळपास ५२० बसेसमध्ये ही सुविधा देण्यात येणार होती़ त्यामध्ये नांदेड आगारातील ८० बसेसमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून टप्प्याटप्याने इतर बसेसमध्येही वायफाय मिळणार आहे़प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन धावणारे एसटी महामंडळ खाजगी वाहतुकीमुळे गेल्या काही वर्षांपासून तोट्यात जात आहे़ त्यासाठी महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात़ग्रामीण भागात एसटीशिवाय पर्याय राहिला नसला तरी, शहरी भागात मात्र प्रवाशांचा खाजगी वाहतुकीकडेच अधिक ओढा असतो़ ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आरामदायी बस तसेच दर्जेदार आणि मनोरंजनात्मक प्रवासासासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे़ तरुणांमध्ये वाढती मोबाईलची क्रेझ पाहता मनोरंजनासाठी सर्वच गाड्यांमध्ये वायफायचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्याबाबतचे कंत्राट एका खाजगी कंपनीस देण्यात आले आहे़पहिल्या टप्प्यात नांदेड आगारातील १३० पैकी ८० बसेसमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ ती कार्यान्वितही झाली आहे़ सुरुवातीला डेटा कमी असून पुढे तो वाढविण्यात येणार आहे़ ग्रामीण भागात नेटवर्कमध्येही अडचणी येत आहेत़ या अडचणी सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत़