शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नांगर धरण्याची ताकद ज्याच्या मनगटात, त्यालाच अध्यक्ष करू

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

पानगाव : ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले

पानगाव : वातानुकूलित वातावरणात वावरणारा व वातानुकूलित गाड्यांमध्ये फिरणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. तर तळागाळातून, सर्वसामान्य माणसांतून पुढे आलेला सामान्य कार्यकर्ता, ज्याला की प्रश्नांची जाण आहे. ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेणापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पानगाव येथे झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते. मंचावर आमदार विनायकराव पाटील, रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, विजय क्षीरसागर, ओमप्रकाश गोडभरले, ‘पन्नगेश्वर’चे उपाध्यक्ष किशन भंडारे, काशीराम पाटील, राजकुमार मजगे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, भागवत सोट, विजय काळे, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके, व्यंकट अनामे, मंजुषा कुटवाड, ललिता कांबळे, शालिनी कराड, सुरेश लहाने, भाऊसाहेब हाके-पाटील, नवनाथ भोसले, वसंत दहिफळे, श्रीकिशन जाधव, पृथ्वीसिंह बायस, दिलीप धोत्रे, सुकेशिनी भंडारे, गंगासिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेस देशात व राज्यात सत्तेत होती. त्यांनी काहीच केले नाही. किमान लातूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काँग्रेसला करता आली नाही. त्यामुळेच काँग्रेसला सध्या अनेक ठिकाणी उमेदवारही मिळत नाहीत. जिल्ह्यात लातूर, लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा व निलंगा हे काँग्रेसचे बुरुज आहेत. त्यापैकी निलंग्याचा बुरुज मी उखडून फेकला आहे. इतर बुरुजं आपल्याला संपवायचे आहेत. येत्या निवडणुकीत निलंग्यात काँग्रेसचे खातेही उघडू देणार नाही. (वार्ताहर)