शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

‘त्या’ कामांना शिफारस कोणाची ?

By admin | Updated: July 5, 2014 00:38 IST

चेतन धनुरे, लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात झालेल्या रस्ते कामाचे गौडबंगाल लवकरच समोर आणण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे़ परंतु, ज्या ६२ रस्ते कामांवर संशय आहे,

चेतन धनुरे, लातूरजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात झालेल्या रस्ते कामाचे गौडबंगाल लवकरच समोर आणण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे़ परंतु, ज्या ६२ रस्ते कामांवर संशय आहे, त्या कामांना कोणाचे शिफारसपत्र जोडले गेले, ही माहितीही समोर येणे गरजेचे आहे़एसआरएफ निधीअंतर्गत जिल्ह्यात जवळपास १४ कोटी ८७ लाख रुपये खर्ची घातले गेले आहेत़ त्यातून १६० कामे होऊन त्याची बिलेही अदा केली गेल्याची लेखी माहिती वित्त विभागाने दिली असताना बांधकाम विभागाने मात्र १०८ कामांचाच उल्लेख केला आहे़ या रस्तेकामांपैकी ६९ रस्त्यांना त्या-त्या मतदारसंघातील सदस्यांनी शिफारस केलेली आहे़ उर्वरीत ३८ कामांपैकी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी २० ला० ५० हजार रुपयांच्या रस्तेकामाची शिफारस केली आहे़ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्येकी १५ लाख रुपयांची दोन कामे शिफारस केली आहेत़ आमदार अमित देशमुख यांनी १५ लाख रुपयांचे एक तर आमदार वैजनाथ शिंदे यांनी १० लाख रुपयांच्या एका कामास शिफारस केली असल्याचेही अहवालात नमूद आहे़ आमदार बाबासाहेब पाटील यांनी ३१ तर आमदार दिलीपराव देशमुख यांनी २५ लाखांची प्रत्येकी दोन कामांना शिफारस केली आहे़ बांधकाम समिती सदस्यांनी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या ९ कामांना शिफारस केली आहे़ तर अध्यक्ष व बांधकाम सभापती कल्याण पाटील यांनी संयुक्तरित्या २१ कामांसाठी शिफारस केली आहे़ या १०८ कामांत सर्व निधी खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे़ परंतु, वित्त विभागाने बिले काढलेल्या इतर ६२ कामांना कोणाची शिफारस होती, हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे़ लोकप्रतिनिधींनी खरोखर शिफारसपत्रे दिली होती की खोटी शिफारसपत्रे जोडून या कामांचा गोलमाल करण्यात आला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे़ अशी चौकशी झाल्यास या घोळामागे दडलेले सगळेच मोहरे समोर येतील़ ही नावे कधी अध्यक्ष व सभापती कधी जाहीर करतात, याकडे लक्ष लागले आहे़