शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले

By admin | Updated: December 28, 2016 00:06 IST

जालना :८ हजारांची लाच घेताना घोन्सी येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेरकर यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जालन्यात सापळा लावून मंगळवारी रंगेहाथ पकडले.

जालना : गृह कर्जासाठी नमुना नं. ८ आणि नाहकरत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून ८ हजारांची लाच घेताना घोन्सी येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेरकर यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जालन्यात सापळा लावून मंगळवारी रंगेहाथ पकडले.घनसावंगी तालुक्यातील घोन्सी येथील तक्रारदार एका फायनास कंपनीकडून घर बांधकामासाठी दीड लाखाचे गृह कर्ज घेणार होते. या कर्जासाठी ग्रामपंचायतीचा नमुना नं ८ व ना हकरत प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यांनी ग्रामसेवक शेरकर आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली. या कामांसाठी २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून २७ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा लावला. तक्रारदार व ग्रामसेवक यांच्यात लाचेच्या मागणीची तडजोड झाली. १५ हजार रूपये घेणार असल्याचे ग्रामसेवकाने पंचासमक्ष सांगितले. त्यापैकी ८ हजार रूपयांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात पकडले.सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधीक्षक डी. डी, गवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद, व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी टेहरे, धायडे दौडे, आगलावे, शेंडीवाले, उदगीरकर आदी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)