शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाच्या योजना जातात कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:12 IST

आदिवासींसाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत़ मग त्या योजना जातात कुठे, असा सवाल करीत आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी अन् शासनाची आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आदिवासींसाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत़ मग त्या योजना जातात कुठे, असा सवाल करीत आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी अन् शासनाची आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेडात पार पडले़ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मंचावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री अर्जुन खोतकर, आ़हेमंत पाटील, आ़सुभाष साबणे, आ़प्रताप पाटील चिखलीकर, मुक्तेश्वर धोंडगे, माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा, भाजप महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, मिलिंद देशमुख, सेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, बाळासाहेब देशमुख, सतीश पिंलगवाड, बी़ डी़ वाघमारे, नरसिंगराव जेठेवाड, चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रा़अनंत राऊत, ज्योतीबा खराटे, श्यामसुंदर शिंदे, नागनाथ घिसेवाड, संतोष वारकड, दिगंबर टिपरसे आदींची उपस्थिती होती़यावेळी पालकमंत्री खोतकर म्हणाले, आचारसंहिता संपल्यानंतर आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या विविध प्रश्नांवर मुंबईत बैठक बोलवू़ दरम्यान, नागनाथ घिसेवाड यांनी आदिवासी समाजातील अधिकाºयांनी वेगवेगळ्या जमातीला दूर करण्याचे काम केले असून त्यांनी मन्नेरवारलूला यादीतून हद्दपार करण्याचे काम केले़ त्यामुळे आदिवासी विकास विभाग व आदिवासींशी संबंधित कार्यालयात गैरआदिवासी अधिकाºयांची नियुक्ती करावी़ आ़ सुभाष साबणे म्हणाले, अनेक अधिकाºयांना निलंबित करण्याचे आश्वासन देऊनसुद्धा त्यांना सरकार निलंबित करीत नाही़ येणाºया नागपूर अधिवेशनात हा विषय लावून धरला जाईल़, असे आश्वासन दिले़ आ़ हेमंत पाटील म्हणाले, वाघाची जमातच वाघाला ओळखते.़ वाघ हा जंगलात असतो आणि आदिवासी बांधवदेखील जंगलात राहतात़ त्यामुळे त्यांचे प्रश्न शिवसेनेचा वाघच सोडवेल़ उद्योजक अमितकुमार कंठेवाड यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला़ तसेच शिवाजीराव बोधगिरी, लक्ष्मण पोशट्टी यांनाही सन्मानित करण्यात आले़ प्रास्ताविक आयोजक प्रवीण जेठेवाड तर सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले़