शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वेबसाइटवर विक्रीकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:05 IST

वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होऊन महिना उलटला; पण अजूनही राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे नाव विक्रीकर विभागच आहे

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होऊन महिना उलटला; पण अजूनही राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे नाव विक्रीकर विभागच आहे. १ जुलै रोजी रेल्वेस्टेशनसमोरील विक्रीकर भवनच्या इमारतीची पाटी बदलून तिथे राज्य वस्तू व सेवाकर भवन असा नवीन फलक लावण्यात आला; पण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अजूनही ‘डिपार्टमेंट आॅफ सेलटॅक्स’ हेच नाव आहे.केंद्र सरकार ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमावर भर देत आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे, पण याला ‘खो’ देण्याचे काम विभागातर्फे करण्यात येत आहे. ‘सरकारी काम, महिनाभर थांब’ या उक्तीला साजेसे काम सरकारी विभागातर्फे नेहमीच होत असते, याची प्रचीती यानिमित्ताने येत आहे. वेबसाइट सतत अद्ययावत करण्याचे काम मुंबईतून केले जाते. हे काम ज्यांना देण्यात आले त्यांचीही ‘सरकारी कामाची’ सवय अजून गेली नाही, हेच यावरून सिद्धहोते.एवढेच नव्हे, तर जीएसटी विभागाच्या सहआयुक्त दीपा मुधोळ-मुंडे या रुजू होऊन पाच महिने झाले, पण अजूनही वेबसाइटवर सहआयुक्त म्हणून डी.एम. मुगळीकर यांचेच नावआहे. नवीन सहआयुक्तांचे नाव टाकण्यासही संबंधितांना वेळ मिळाला नाही; मात्र जीएसटीविषयीची माहिती या वेबसाइटवर अपडेट केली जात आहे, हे विशेष.केंद्र सरकारच्या (सीजीएसटी विभागाच्या) वेबसाइटवर ‘गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) कमिशनरेट, औरंगाबाद’ असे नाव बदलण्यात आले आहे. १ जुलैआधी या विभागाचे नाव ‘केंद्र उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभाग’ (सीबीईसी) असे होते. मात्र जीएसटी लागू होताच या विभागाच्या वेबसाइटवरील नावात लगेच बदल करण्यात आला. त्या धर्तीवर राज्य जीएसटी विभागाच्या वेबसाइटवरील नावही बदलणे आवश्यक होते.