शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

हम लढेंगे, हम जीतेंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:17 IST

महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे कोणतेही आव्हान नसून ‘हम लढेंगे, हम जितेंगे’ अशा शब्दात आगामी महापालिका निवडणुकीतील यशाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. नांदेड महापालिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचीच राहील, असेही ते म्हणाले.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे कोणतेही आव्हान नसून ‘हम लढेंगे, हम जितेंगे’ अशा शब्दात आगामी महापालिका निवडणुकीतील यशाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. नांदेड महापालिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचीच राहील, असेही ते म्हणाले.काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या दौºयाबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाबाबत असलेली निष्ठा या दोन मुद्यांवर तिकिट वाटपकेले जाईल, असे स्पष्ट करीत काँग्रेस विकासाचा ध्यास असणारा पक्ष आहे. या धोरणाला नांदेडकरांनी नेहमीच पाठिंबा दिल्याचे सांंगत महापालिका निवडणुकीतही नांदेडकर काँग्रेसलाच विजयी करतील, असा विश्वास व्यक्त केला.महापालिकेच्या दलित वस्तीचा ३० कोटींचा निधी राज्य सरकारने अडवून ठेवला आहे. दलितांच्या विकास योजनांमध्ये आडकाठी आणण्याचे धोरणच या सरकारने अवलंबिले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे नांदेडमध्ये दलित वस्तीची कामे अडविणे होय. पायाभूत सुविधांसाठी असलेला निधी अडवून ठेवणे ही गंभीर बाब आहे. याबाबत काँग्रेसकडून निश्चितच आवाज उठवला जाणार असून महापालिका निवडणुकीत जनतेपुढे हा विषय ठेवला जाईल, असेही ते म्हणाले.महापालिका निवडणुकीत तिसºया आघाडीची चर्चा केली जात आहे. ही तिसरी आघाडी भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप करीत या आघाडीला जनता स्वत:च त्यांची जागा दाखवून देईल. निवडणुकीत राष्ट्रवादीसह इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी चर्चेचा मार्ग खुला आहे, यासाठीचे सर्व अधिकार महानगराध्यक्षांना राहतील, असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.