शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विशेष गाडी बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: June 27, 2017 00:24 IST

नांदेड : मराठवाड्यातील खासदार आणि प्रवाशांची अनेक वर्षांपासून मुंबई आणि नागपूरसाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मराठवाड्यातील खासदार आणि प्रवाशांची अनेक वर्षांपासून मुंबई आणि नागपूरसाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी आहे़ त्यानुसार दक्षिण मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाडी म्हणून सुरू केलेल्या नांदेड - अजनी (नागपूर) गाडीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे़ त्यामुळे सदर एक्स्प्रेस नियमितपणे चालविण्याऐवजी बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे़ नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याबरोबर मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी नांदेड येथून स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी खासदार तसेच विविध प्रवासी संघटनांकडून नेहमीच होत असते़ अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर नवीन नांदेड -मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याच्या हालचालींना रेल्वे बोर्डाने वेग दिला आहे़ तशी माहिती नांदेड विभागाकडून मागविली जात आहे़ दरम्यान, सदर गाडीला रेल्वेमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आले असता हिरवी झेंडी मिळेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, विकासकामांच्या उद्घाटनाशिवाय रेल्वेमंत्र्यांनी काही विशेष भेट नांदेडसह मराठवाड्याला दिली नाही़ नव्याने सुरू होणारी नांदेड - मुंबई रेल्वे अकोलामार्गे सुरू करण्याच्या हालचालींना ब्रेक बसला आहे़ या मार्गाने गाडी मुंबईत पोहोचण्यास १६ तास लागत आहेत़ त्यामुळे सदर गाडी मनमाडमार्गेच धावणार असल्याचे दमरेचे महाव्यवस्थापक यादव यांनी नांदेड दौऱ्यात स्पष्ट केले़ मुंबई गाडी अकोलामार्गे धावणार नसली तरी अकोला, हिंगोली, वाशिम जिल्ह्णातील प्रवाशांसाठी अकोला ते पूर्णा अशी लिंक रेल्वे सुरू करण्यात येणार आहे़ सदर गाडी आठ ते दहा डब्याची राहणार असून ती पूर्णा येथून मुंबई गाडीला जोडण्यात येईल़ सदर गाडी सुरू करण्यास मध्य रेल्वेने संमती दर्शविली आहे़ नागपूरसाठी विशेष रेल्वे म्हणून सुरू केलेल्या अंजनी एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद मिळत आहे़ पूर्वी सदर गाडीला ५ ते ७ टक्के प्रवासी मिळत होते़ त्यानंतर प्रवाशांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे वाढ होवून प्रवाशांचे प्रमाण १८ टक्क्यांवर गेले आहे़ येणाऱ्या काळात ३० टक्के प्रवासी मिळाले नाहीत तर नागपूर गाडी कायमस्वरूपी बंद होऊ शकते़ त्यामुळे प्रवाशांनी नांदेड - अंजनी (नागपूर) विशेष रेल्वेने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी केले आहे़