शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

नियमांची लावली ‘वाट’

By admin | Updated: February 17, 2015 00:44 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) शहरात मोंढा नाका, सिडको बसस्थानक आणि बाबा पेट्रोल पंप चौक या तीन ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे

औरंगाबाद : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) शहरात मोंढा नाका, सिडको बसस्थानक आणि बाबा पेट्रोल पंप चौक या तीन ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. या कामाच्या ठिकाणी ठेकेदारांनी साईड रोडच्या नियमाचीच वाट लावली आहे. पुलाचे काम सुरू करण्याआधी नियमानुसार साईड रोड बनविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुलाच्या या कामाची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’ सारखी झाली आहे. शहरात वाहनांची संख्या १० लाखांच्या वर पोहोचली आहे. ३० ते ४० टक्के वाहने दिवसातून एकदा तरी शहराची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या जालना रोडवरून ये-जा करतात. ४शहरात उभारण्यात येत असलेले तिन्ही उड्डाणपुलांच्या बाजूने ड्रॉर्इंगप्रमाणे आणि नियोजनाप्रमाणे पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत. तिन्ही उड्डाणपुलांच्या बाजूने सात मीटरचे पर्यायी रस्ते आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता उदय भरडे यांनी दिली.अधिकाऱ्यांचे अभय?४तरतुदीनुसार पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी अनेक बांधकामांवर हातोडा पडण्याची वेळ येण्याची शक्यता दिसून येते. ४बांधकामांवर हातोडा पडण्याच्या भीतीनेच बाबा पेट्रोलपंप येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलास सुरुवातीलाच विरोध करण्यात आला होता.४पर्यायी रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी बांधकामांना अभय देत असल्याचे दिसून येत आहे.उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूने सात मीटर रुंदीचे साईड रोड बनवावेत. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात करावी, अशी कंत्राटातच अट घालण्यात आलेली होती. प्रत्यक्षात या अटीला तिन्ही ठिकाणच्या ठेकेदारांनी बगल दिल्याचे दिसून येते. एक तर काम सुरू करण्यापूर्वीच साईड रोड बनविणे बंधनकारक होते; परंतु ठेकेदारांनी एकीकडे पुलाचे काम सुरू केले आणि मग काही दिवसांनी साईड रोड बनविले. सदर प्रतिनिधीने पाहणी केली असता हे साईड रोड काही ठिकाणी तीन, काही ठिकाणी साडेतीन मीटरचे आहेत, तर काही ठिकाणी अडीच ते अवघ्या तीन, साडेतीन मीटरचेच. विशेष म्हणजे हे साईड रोड बनविताना खडी टाकून मजबुतीकरण करून नंतर डांबरीकरण करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात या ठेकेदारांनी जुन्या रोडवरच थोडी खडी व डांबराचा थर टाकून थातुरमातुर रस्ते बनविले.