लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने तूर, सोयाबीन, ज्वारी, तूर, कापूस यासह अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाले असले तरी तूर, सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला तर भाववाढीच्या भरवशावर बसलेल्या कापूस उत्पादकांना आता करावे काय, असा प्रश्न पडला आहे. हंगामात कापूस ५६००-५७०० रुपये प्रतिक्विंटल विकला. ७ हजारापर्यंत भाव जाईल, अशी चर्चा त्यावेळी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विवक्री केला नाही. आता मात्र, फरदड कापसाला ३४०० ते ३८०० तर सुपर कापसाला ५२०० रुपये भाव असल्याने साठवून ठेवलेला कापूस उत्पादकाला आर्थिक फटका बसल्याने हवालदिल झाले आहेत.मंठा तालुक्यात यावर्षी कापसाचे विक्री उत्पादन झाले असले तरीही तीन वर्ष सतत दुष्काळ पडल्याने आणि कापसाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने आर्थिक नड भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बटाव पद्धतीने कमी भावात कापूस विकून टाकला.जिनिंग मालक कापसाच्या रकमेचे धनादेश देत असल्याने एक एक महिना पैशाला विलंब लागला. त्यातही चलन तुटवड्यामुळे शेतकरी हैराणझाले तर भाव वाढून मिळले, या आशेवर अनेक कापूस उत्पादक शेतकरी बसले होते. त्यांच्या घरात ५० ते १०० क्विंटल कापूस आहे. तोही सुपर परंतु भाव गडगडल्याने करायचे काय, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी
By admin | Updated: May 18, 2017 00:30 IST