शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा चक्क गायब...!

By admin | Updated: September 3, 2014 00:24 IST

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली केली आहे.

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली केली आहे. आजवर किती नळधारकांनी मनपाची पाणीपट्टी बुडविली, थकविली आहे याचे अधिकृत रेकॉर्ड अद्याप प्रशासनाने तयार केलेले नाही. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मते ६० कोटींची थकबाकी असेल; परंतु करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी मात्र आयुक्तांना त्या प्रकरणी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ती रक्कम किती हे अद्याप समोर आलेले नाही.१ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील पाणीपुरवठा आणि देखभालीचे काम सुरू केले आहे. १ लाख १० हजार घरगुती नळांची नोंद मनपा दप्तरी आहे, तर २ हजारांच्या आसपास व्यावसायिक नळधारक शहरात आहेत. नळधारकांच्या यादीत हस्तांतरणानंतर मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करसंकलन विभाग पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा मागील अनेक वर्षांपासून उद्देशामध्ये दाखवीत नाही. पुढे अफाट मागे सपाट अशा पद्धतीने आजवर वसुली करण्यात आली आहे. जीटीएलच्या पावलावरमनपाने जीटीएलच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. महावितरणने जीटीएलकडे वीजपुरवठा, देखभाल-दुरुस्तीचा ठेका दिल्यानंतर बड्या थकबाकीदारांकडील रकमेचे काय केले याचे उत्तर अजूनही मिळत नाही, तसे मनपा आणि एसीडब्ल्यूयूसीएल करारामुळे होऊ नये म्हणजे झाले. पाणीपट्टीतून मिळाले ५ कोटी१ एप्रिल २०१४ ते २१ आॅगस्ट २०१४ पर्यंत पाणीपट्टीतून ५ कोटी १ लाख २१ हजार रुपये मनपाने वसूल केले आहेत. गतवर्षी पाणीपट्टीतून २२ कोटी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. नळधारकांच्या आकडेवारीचा विचार केला, तर ३१ मार्च २०१४ पर्यंत २ हजार ७५० रुपयांप्रमाणे ३० कोटी २५ लाख रुपये वसुली होणे गरजेचे होते.१ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी पाणीपट्टी वसुली करणार आहे. ६० कोटींच्या आसपास पाणीपट्टीची थकबाकी असू शकते. मात्र तो आकडा निश्चित नाही. थकबाकी वसूल केल्यास कंपनीला कमिशन देण्यात येणार आहे. ५० टक्के वसुली केली, तर रकमेच्या १५ टक्के कमिशन देण्यात येईल. ५१ ते ७५ टक्के थकीत पाणीपट्टीची वसुली केल्यास २० टक्के आणि ७५ टक्क्यांहून अधिक वसुली केल्यास ३० टक्के कमिशन कंपनीला देण्यात येईल, असे आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले.