शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरला उद्या मिळणार पाणी

By admin | Updated: May 4, 2016 00:18 IST

उदगीर : उदगीर शहराला वागदरीच्या तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या १० पैकी ३ टँकर मंगळवारी रात्री लातूरहून उदगीरला आले़ उर्वरीत ७ टँकर नांदेडहून निघाले आहेत़

वागदरीत चाचणी : देवणीत सर्वपक्षीय विरोधाची मोटउदगीर : उदगीर शहराला वागदरीच्या तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या १० पैकी ३ टँकर मंगळवारी रात्री लातूरहून उदगीरला आले़ उर्वरीत ७ टँकर नांदेडहून निघाले आहेत़ या सर्व टँकरद्वारे बुधवारपासून पाण्याची वाहतूक सुरु होणार आहे़ त्यानंतर हे पाणी फिल्टर होवून गुरुवारी उदगीरकरांच्या घागरीत पडण्याची अपेक्षा नगरपरिषदेला आहे़ दरम्यान, देवणीत मात्र यास विरोध सुरु झाला आहे़ उदगीर शहराच्या पाणीपुरवठ्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे़ बनशेळकी, भोपणी प्रकल्प कोरडे झाल्याने एकमेव देवर्जन प्रकल्पातून पाण्याचा उपसा केला जात आहे़ मात्र, येथेही तलाव कोरडा पडू लागल्याने पाण्याची आवक घटत चालली आहे़ त्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रत्येकी २५ हजार लिटर्स क्षमतेचे १० टँकर मंजूर केले आहेत़ या टँकरद्वारे वागदरी तलावातून दररोज १० लाख लिटर्स पाणी उदगीरसाठी उचलण्याची तयारी केली जात आहे़ वागदरीच्या तलावात नगरपरिषदेने मोटार बसवून त्यास विद्युत जोडणीही घेतली आहे़ सोमवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेण्यात आली़ ती यशस्वी झाली आहे़ त्यामुळे आता टँकरची प्रतीक्षा आहे़ मंजूर झालेल्या १० टँकर्सपैैकी ३ टँकर मंगळवारी सायंकाळी लातुरातून उदगीरकडे रवाना झाले़ तर उर्वरीत ७ टँकर नांदेडहून निघाले आहेत़ त्यामुळे बुधवारी सकाळपासून या सर्व टँकरच्या वागदरीच्या तलावातून फेऱ्या सुरु होणार आहेत़ येथील पाणी उदगीर पालिकेच्या बनशेळकी फिल्टरजवळील मोठ्या खड्ड्यात एकत्र करुन ते फिल्टर केले जाणार आहे़ त्यानंतर ते उदगीरमध्ये आणून नळाद्वारे वितरीत केले जाणार आहे़ या प्रक्रियेनुसार उदगीरच्या काही भागामध्ये गुरुवारी वागदरीचे पाणी मिळण्याची अपेक्षा आहे़ (प्रतिनिधी)पाण्यासाठी देवणी-उदगीरात संघर्ष़़़एकीकडे उदगीरकर पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करीत असतानाच देवणीकरांनीही वागदरीच्या पाण्यावरुन संघर्षाची तयारी चालविली आहे़ देवणीसाठी या तलावातून आधीपासूनच पाणी घेणे सुरु आहे़ ३० जूनपर्यंत देवणीला १ कोटी ९६ लाख लिटर्स पाणी आवश्यक आहे़ उदगीरसाठी येथून उचल सुरु झाल्यास हे पाणी देवणीला पुरणार नाही, असा दावा करीत देवणीत सर्वपक्षीय विरोधाची मोट बांधली जात आहे़ उदगीरला विरोध नाही परंतु, आधी देवणीची व्यवस्था करुनच मग पाणी द्यावे, असा सूर देवणीतून उमटत आहे़