शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

वेरूळ लेणीत गार्डनसाठी पाणी; पिण्यासाठी मात्र नाही, पर्यटकांचे हाल

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

सुनील घोडके, खुलताबाद जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठी शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात येत असून विद्यार्थ्यांच्या गर्दीने वेरुळलेणी गजबजली आहे.

सुनील घोडके, खुलताबादजगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठी शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात येत असून विद्यार्थ्यांच्या गर्दीने वेरुळलेणी गजबजली आहे. मात्र, या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही तर दुसरीकडे मात्र गार्डनसाठी चोवीस तास पाणी उपलब्ध असल्याने पर्यटक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.पर्यटन हंगाम सुरू झाल्याने देशी-विदेशी पर्यटकांसह शैक्षणिक सहलीमुळे लेणी परिसर गजबजला असून या परिसरात विद्यार्थी डबे खातात पण, पिण्यासाठी पाणीच नाही. लेणी परिसरात असलेल्या नळाला गेल्या आठ दिवसांपासून पाणी नाही. पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी पर्यटकांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. लेणी परिसरातील एकमेव असलेल्या नळाची पाईपलाईन नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येते. आठ दिवसांत पुरातत्त्व खात्यास पाईपलाईन दुरुस्त करण्यास वेळ मिळाला नाही काय? असा सवाल पर्यटक करीत आहेत. दुसरीकडे मात्र गार्डनसाठी पाणी चोवीस तास सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. वीस रुपयांची पाण्याची बाटली विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.बॉम्बशोधक पथकाडून तपासणीसध्या पर्यटकांच्या गर्दीने वेरूळ लेणी परिसरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक (ग्रामीण) लेणी परिसरातील भागाची तपासणी श्वानाकडून करण्यात येत आहे. कुठल्याही घातपाती कारवाया होऊ नयेत म्हणून पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, वेरुळ लेणी पोलीस चौकीचे पो.हे.कॉ. उंबरे, रत्नपारखे लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)