शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:59 IST

मागील दोन दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक वसाहतीला किमान पिण्यापुरते तरी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी आणि शनिवारी ३६ तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक वसाहतीला किमान पिण्यापुरते तरी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रविवारी आणि सोमवारी ज्या वसाहतींना पाणी मिळाले नव्हते त्यांना चक्क मंगळवारी पाणी देण्यात आले. दिवसभरात पाणी आले नसल्याची एकही तक्रार नगरसेवक, नागरिकांनी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली नाही.दिवाळीत पाणीपुरवठा सुरळीत राहावा या दृष्टीने महापालिकेने ३६ तासांचा शटडाऊन घेतला होता. खंडण काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिन्यांची गळती थांबविण्याचे काम केले. याच काळात फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्यात आला. शहरातील विविध व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीपासून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. मागील तीन दिवसांमध्ये शहरातील १५ लाख नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिका तारेवरची कसरत करीत आहे. ३६ तासांच्या खंडण काळामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सोमवारी आणि मंगळवारी शहरातील बहुतांश वसाहतींना पाणी देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली. सोमवारी रोटेशननुसार अनेक वसाहतींना पाणी देणे मनपाला शक्य झाले नव्हते. मंगळवारी दिवसभर कमी-जास्त प्रमाणात पाणी देण्यात आले. जाधववाडी, सुरेवाडी, मयूरपार्क, नंदनवन कॉलनी आदी वसाहतींना पाणी दिले. पाणीपुरवठ्याचे एक चक्र पूर्ण होईपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येणार नसल्याचे चहल म्हणाले. मंगळवारी एकाही नगरसेवकाने पाणी आले नाही, अशी तक्रार केली नाही, असा दावाही त्यांनी केला.