शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीस्थिती अद्यापही गंभीर!

By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST

औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़

औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़ कमी-अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ तीन महिन्यांत केवळ २९८ मि़मी़ इतकाच पाऊस झाला असून आता पावसाळा संपत आला आहे़ परंतु, अद्यापही तालुक्यातील पाण्याची स्थिती गंभीर आहे़ त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे़ खरीप हंगामातील पेरण्यासाठी औसा तालुक्यात यावर्षी वेळेवर पाऊस झाला नाही़ तसेच जो झाला तोही पाऊस तालुक्यात समान नाही़ तब्बल महिनाभर उशिराने पाऊस झाल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या़ तालुक्यात ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली़ यात ६० हजार २३८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ यामधील ४० ते ५० शेतकऱ्यांना सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या़ तालुक्यात पावसाची स्थिती तशी नाजूकच राहिली आहे़ मागील काही वर्षांपासून सतत कमी होत असलेला पाऊस यावर्षी तर अधिकच कमी झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीरच आहे़ पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत़ सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी- तांड्यावर अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू आहे़ आतापर्यंत सप्टेंबरमध्ये अधिग्रहण करण्याची वेळ आली नव्हती़ ती यावर्षी आली आहे़ रिमझिम पावसाने बहुतांश पिकावर रोग पडले आहेत़(वार्ताहर)तालुक्यात यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत मागील तीन महिन्यात केवळ २९८़४१ मि़मी़ इतकाच पाऊस झाला आहे़ यामध्ये सर्वाधिक पाऊस औसा मंडळात झाला आहे़ सर्वात कमी पाऊस किनीथोट मंडळात झाला आहे़ महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस असा- औसा ३७१ मिमी, लामजना २९४ मिमी, मातोळा २३४, किल्लारी ३४८, भादा २९१, बेलकुंड २६० तर किनीथोट १९१ मिमी इतका पाऊस झाला आहे़ तालुक्याची वार्षिक सरासरी ७८१ मि़मी़ इतकी आहे़ पावसाळ्याचे तीन महिने संपून गेले़ पण पावसाने मात्र अजूनही वार्षिक सरासरीची पन्नाशी गाठलेली नाही़ त्यामुळे धरणे, नद्या, नाले, विहिरी, बोअर अजूनही कोरडे आहेत़ आगामी काळात जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर यावर्षी दिवाळीनंतर लगेचच पाणीटंचाई सुरु होणार आहे़कमी पावसामुळे सध्या सबंध तालुक्यातील पाणी साठ्यांची स्थिती चिंताजनक आहे़ मोठा पाऊस झाला तरच विहिरी, तलाव भरतील आणि पाण्याचा प्रश्न सुकर होईल, असे तहसीलदार दत्ता भारस्कर व गटविकास अधिकारी अनंत कुंभार यांनी सांगितले़