शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा..!

By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST

भूम : तालुक्यात यंदाही ऐन हिवाळ्यात काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, सध्यस्थितीत पंचायत समितीकडे वालवड येथील

भूम : तालुक्यात यंदाही ऐन हिवाळ्यात काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, सध्यस्थितीत पंचायत समितीकडे वालवड येथील ग्रामपंचायतीने टँकरसाठी तर वारेवडगाव ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. येणाऱ्या काळात टंचाई परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यताही जलस्त्रोतांमधील उपलब्ध साठ्यावरून दिसून येत आहे.तालुक्यात यंदा काही बोटावर मोजण्याइतपत मध्यम, लघु प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाला असला तरी बहुतांश प्रकल्पात अत्यल्प साठा आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच अनेक गावांत पाणीटंचाईचे सावट गडद होत असल्याचे चित्र आहे. वालवड, अंभी सर्कलमध्ये सध्या पाणीप्रश्श्न गंभीर झाला आहे. वालवड येथील ग्रामपंचायतीने २० नोव्हेंबर रोजीच टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केला आहे. याशिवाय वारेवडगाव येथील पाणीपुरवठा विहिरीनेही तळ गाठला असल्यामुळे विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरम्यान, वालवड येथे सध्या आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, येथे टँकर सुरु करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)४तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झालेला असल्याने याच अनुषंगाने आॅक्टोबर ते जून २०१५ या कालावधीसाठीचा २ कोटी ४७ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा यापूर्वी पंचायत समितीने तयार करून पाठविला आहे. परंतु, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पाणीटंचाईबाबत पुन्हा आढावा बैठक घेऊन येणाऱ्या मागणीनुसार सुधारित आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी टी. बी. उगलमुगले यांनी सांगितले.केवळ ४४३ मिमी पाऊस४तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९०६ असली तरी यंदाच्या पावसाळ्यात केवळ ४४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्कलनिहाय आकडेवारी पाहता तालुक्यातील वालवड सर्कलमध्ये ३२५ मिमी, अंभी ३४३, माणकेश्वर ४७६, ईट ४३९ तर भूम सर्कलमध्ये ६६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.