शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

पाण्यासाठी दाहीदिशा

By admin | Updated: June 6, 2014 01:10 IST

औरंगाबाद : महावितरण आणि महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेमुळे शहरात तीन दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे. पाणीपुरवठ्याचे

औरंगाबाद : महावितरण आणि महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेमुळे शहरात तीन दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे.पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे महावितरणकडून वीजपुरवठा होत नसल्याचे कारण मनपाने जाहीर केले आहे, तर महावितरण कंपनी सूत्रांनी पालिकेच्या वितरण यंत्रणेवर बोट ठेवले आहे. दोन्ही संस्थांच्या ‘तू-तू-मैं-मैं’मध्ये नागरिकांना पाण्यासाठी महागडे टँकर्स घ्यावे लागले. हातपंपावर पाण्यासाठी धावपळ करावी लागली, तर काही नागरिकांनी हर्सूल तलावातून हातगाडी, रिक्षाने पाणी आणले. ज्यांच्याकडे ‘वॉटर स्टोरेज’ होते त्यांना पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र, गुंठेवारी वसाहतींसह काही मध्यमवर्गीय भागांमध्ये पाणीटंचाई दिसून आली. पाणीटंचाईच्या विरोधात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दालनासमोर आघाडी नगरसेवकांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली, तर नगरसेवक कृष्णा बनकर यांनी मनपा प्रवेशद्वारावर मोर्चा काढून धरणे दिले.खाजगी पाणी टँकरचा धंदा तेजीतऔरंगाबाद : शहरात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे खाजगी टँकरवाल्यांचा कॉलनी, नगर, सोसायटीत पाण्याचा बाजार तेजीत आहे. मनपाचे ८० टँकर शहराच्या विविध कॉलनी, झोपडपट्टी, सिडकोच्या उच्चभ्रू वसाहतीत फेर्‍या मारत असून, ज्या भागात मनपाचे टँकरही येत नाही अन् पाणीपुरवठाही होत नाही, अशा ठिकाणी खाजगी टँकरला आजही मोठी मागणी आहे. परिसरातील विंधन विहिरींनी तळ गाठल्यामुळे सर्वांची भिस्त टँकरच्या पाण्यावरच आहे. गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पडेगाव, भावसिंगपुरा, सिडको, हडको, नक्षत्रवाडी, कांचनवाडी आदी भागही पाणीटंचाईतून सुटलेला नाही. नगरसेवकाकडून मारहाणभाजपाचे नगरसेवक बबन नरवडे यांनी कोटला कॉलनी येथील टँकरचालकाला मारहाण केल्याने मनपा सेवेत असलेल्या खाजगी टँकरचालकांनी संप पुकारला. एन-५ आणि कोटला कॉलनी येथे दुपारी २ वाजेपासून टँकर उभे होते. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात टँकरचालकांनी एक तक्रारही दिली आहे. या प्रकरणी नगरसेवक नरवडे यांना विचारले असता ते म्हणाले की भाग्यनगर, समतानगर, शांतीनगरमध्ये महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अभियंते, लाईनमन याची दखल घेत नाहीत. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी होती. मात्र, टँकरचा पाणीपुरवठादेखील कोलमडला होता. त्यामुळे टँकरचालकांसोबत हुज्जत झाली. मारहाण केली नसल्याचा दावा त्यांनी केला. नगरसेवकांचा ठिय्यापाणीपुरवठा कोलमडल्यामुळे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफरखान, प्रमोद राठोड, काशीनाथ कोकाटे, रवी कावडे, रावसाहेब गायकवाड, गटनेते मीर हिदायत अली यांनी दुपारी ३ वा. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दालनासमोर हंडे घेऊन ठिय्या दिला.नगरसेवकांनी जोरदार घोषणा देऊन दालन परिसर दणाणून सोडला. उपायुक्त रवींद्र निकम यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आयुक्त येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा मनोदय नगरसेवकांनी व्यक्त केला. मनपासमोर धरणेनगरसेवक कृष्णा बनकर यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर मोर्चा काढून धरणे दिले. यामध्ये शेकडो महिलांचा समावेश होता.मागील अडीच महिन्यांपासून भीमनगर, भावसिंगपुरा वॉर्डात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.महापौर, शहर अभियंत्यांकडे तक्रार करूनही पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे बनकर यांनी सांगितले.या भागात पाणीटंचाई४गुंठेवारीच्या ११८ वसाहती, सिडको- हडकोतील २२ वॉर्ड, जुन्या शहरातील काही भागांत आज पाणीटंचाई जाणवली. ४हर्सूल तलावावर अवलंबून असलेल्या १८ वॉर्डांना पाणीपुरवठा होऊ शकला.टँकर्सवाल्यांची चांदीमनपाव्यतिरिक्त सुमारे ७०० टँकर्स खाजगी पुरवठादारांचे आहेत. १२ हजार, १० आणि ८ व ४ हजार लिटर्सच्या टँकरने ते हॉटेल, हॉस्पिटल्ससाठी पाणीपुरवठा करतात. ४०० रुपये ते ४ हजार रुपयांपर्यंत टँकर्सचा भाव आहे. ११८ गुंठेवारी वसाहतींमध्ये मनपाच्या टँकर्सने पाणीपुरवठा होतो.