शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासासाठी पाण्याचे नियोजन गरजेचे :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:05 IST

गल्ले बोरगांव : पाणी हे सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन असून शाश्‍वत विकासासाठी पाण्याचे काटेकोर व शाश्वत नियोजन करणे, ही ...

गल्ले बोरगांव : पाणी हे सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन असून शाश्‍वत विकासासाठी पाण्याचे काटेकोर व शाश्वत नियोजन करणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन परभणी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी केले.

जागतिक जलदिनानिमित्त, सोमवारी (दि.२२) वनामकृवि परभणी व कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘शेतीच्या पाण्याचे नियोजन : काळाची गरज’ या विषयावर जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे डॉ. खोडके यांनी निरसन केले.

पुढे बोलताना डॉ. खोडके म्हणाले की, जगाच्या तुलनेत भारतात फक्त ४ टक्के स्वच्छ पाण्याची उपलब्धता आहे. परंतु भारताच्या लोकसंख्येचा विचार करता आपल्याला हे पाणी कमी पडणार आहे. परिणामी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रतिव्यक्ती १२५ ते १५० लिटर पाणी दररोज लागते. सूक्ष्म नियोजन करून हा वापर प्रतिव्यक्ती प्रतिदिन ७५ लिटर आणणेे शक्य आहे. पाण्याचे संवर्धन व बचत करणे ही काळाची गरज आहे. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना त्यांनी अनेक पैलूंची माहिती दिली. या ऑनलाईन कार्यशाळेत डॉ. देवराव देवसरकर, केव्हीकेचे किशोर झाडे, विषय विशेषज्ज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. अनिता जिंतूरकर, प्रा. गीता यादव, प्रा. अशोक निर्वळ यांचा समावेश होता.