शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून मिळेना पाणी

By admin | Updated: August 28, 2016 00:19 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहराला एकावेळी पाणीपुरवठा करण्यासाठी २४ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार सध्या माजलगाव बॅक वॉटरवर आहे. येथून येणाऱ्या जलवाहिनीला सतत काही ना काही अडचणी येतात. परिणामी, शहरातील विविध भागात १५-१५ दिवस पाणी येत नाही. यामध्ये स्वराज्यनगर, बालेपीर, एकनाथनगर यांसह हद्दवाढीत असलेल्या परिसराचा समावेश आहे. वेळेवर पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव होत असल्याने नळाला पाणी येण्यासाठी विलंब होत असल्याचेही समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा दोन ठिकाणाहून करण्याची व्यवस्था आहे. यामध्ये बिंदूसरा प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. माजलगाव बॅक वॉटर बीडपासून ६० ते ७० किलोमीटरवर आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. यासाठी इलेक्ट्रीसिटीची कमतरता भासत असल्याने देखील पाणी आणण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वेळा कमी क्षमतेने विद्युत पुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणारे पंप चालत नाहीत. परिणामी, ठरलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जातो.