शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

असा झाला होता थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:25 IST

खतरनाक सिमी दहशतवादी अब्रार ऊर्फ इस्माईल हा २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत येऊन येथे एका स्थानिक व्यक्तीला भेटणार असल्याची माहिती औरंगाबादच्या अँटी टेररिस्ट स्कॉडचे (एटीएस) पोलीस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांना खब-याकडून मिळाली होती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खतरनाक सिमी दहशतवादी अब्रार ऊर्फ इस्माईल हा २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत येऊन येथे एका स्थानिक व्यक्तीला भेटणार असल्याची माहिती औरंगाबादच्या अँटी टेररिस्ट स्कॉडचे (एटीएस) पोलीस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांना खब-याकडून मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी व पथकातील सावंत, ठाकरे, शेख आरेफ आदी १६ पोलीस कर्मचारी व अधिका-यांची विविध पथके करून हिमायतबाग परिसरातील भाई उद्धवराव पाटील विद्यालयाच्या मागे सावित्रीबाई फुलेनगरात सापळा रचून बसविली होती. अब्रार एकटाच येणार अशी टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तयारी केली होती; परंतु अब्रार ऊर्फ इस्माईल या दहशतवाद्यासह शाकेर हुसेन ऊर्फ खलील अखिल खिलजी आणि अजहर कुरेशी हे तिघे अतिरेकी त्या दिवशी आले होते. प्रमुख दहशतवादी अब्रार याची ओळख पटताच पोलीस त्याला पकडण्यास सरसावले. रेड्डी यांनी अब्रारला थांबण्याचे निर्देश दिले; परंतु अब्रारचे साथीदार दहशतवादी अजहर कुरेशी ऊर्फ खलील व शाकेर हुसेन या दोघांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबारास सुरुवात केली. प्रत्युत्तरात पोलीस पथकानेही गोळीबारास सुरुवात केली. भरदुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चाऊस कॉलनी रोडवरील प्रेरणा किराणा दुकानासमोर एटीएसचे जवान व दहशतवाद्यात जोरदार चकमक उडाली. शाकेर हुसेन ऊर्फ खलील अखिल खिलजी (२०) याच्या पायात गोळ््या लागल्याने तो जमिनीवर कोसळला. तसेच अब्रार ऊर्फ इस्माईल ऊर्फ मुन्ना (२४) यास पोलिसांनी झडप घालून पकडले. त्याच वेळेस अजहर कुरेशी हा प्रेरणा किराणा स्टोअर्सच्या बोळीतून मागे झाडीत पळाला. पळताना त्याच्या दोन्ही हातात असलेल्या पिस्तुलामधून तो पोलिसांच्या दिशेने गोळ््या झाडत होता. तेव्हा पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी झाडलेली गोळी त्याच्या डोक्यात घुसली व तो जागीच ठार झाला. इतर दोघे अतिरेकी जिवंत पकडले गेले होते. हे तिन्ही अतिरेकी इंदोरहून २६ मार्च २०१२ रोजी एका बोलेरो गाडीतून औरंगाबादेतील हिमायतबागेपर्यंत आले होते. या गाडीचा चालक अन्वर हुसेन हा चकमक पाहून पळून गेला होता.