शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्यांचे ‘वॉकआऊट’

By admin | Updated: February 19, 2016 00:34 IST

जालना : कोणत्याच सदस्यांना विश्वासात न घेता ३६ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. त्याला मंजुरीही देण्यात आली.

जालना : कोणत्याच सदस्यांना विश्वासात न घेता ३६ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. त्याला मंजुरीही देण्यात आली. परंतु मंजूर आराखड्यानुसार जिल्ह्यात पाणीटंचाईचे आणि एमआरजीएसचे आठही तालुक्यांत व्यवस्थित कामे होत नाहीत. याबाबत तक्रारी वारंवार करूनही कामे होत नसल्याने संतप्त सदस्यांनी याचा तीव्र निषेध करून अखेर सभात्याग केला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनता त्रस्त आहे. ग्रामीण भागात शेतमजुरांच्या हाताला काम नाही. पाणीटंचाई भयावह आहे. एमआरजीएसच्या माध्यमातून कामाची गावागावातून मागणी असतांना उदासीन प्रशासनकीय धोरणामुळे शेतमजुरांच्या हाताला कामेच नसल्याने स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. परिणामी जनेतचा रोष सदस्यांना सहन करावा लागतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी यावर वारंवार चर्चा केली. परंतु याकडे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे मजुरांना कामे मिळत नसल्याची खंत सतीश टोपे, संभाजी उबाळे, भगवान तोडावत यांनी केली. कामांत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर जि. प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. वर्कआॅडर न काढताच जिल्ह्यात ४५ कामोंपैकी ३५ कामे पूर्ण झाली आणि २६ कामे प्रगतीपथावर असल्याचे अधिकार व कर्मचारी सांगत आहेत. परंतु वर्कआॅडर्स काढताच कामे कोठे सुरू आहेत हे गटविकास अधिकाऱ्यांना व्यवस्थित सांगता आले नाही. परिणामी तीन महिन्यांपासून या विषयावर चर्चा करण्यात येत आहे. पण ठोस निर्णय होत नसल्याने सदस्यांत प्रचंड नाराजी होती. यावेळी सभापती ए. जे. बोराडे, संतोष धोत्रे, जी. व्ही. चव्हाण, राजेश इंगळे, शहाजी रांक्षे, रामेश्वर सोनुने, राजेश राठोड यांच्यासह जि.प.सदस्यांची उपस्थिती होती.