शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत फिरणारा तोतया डॉक्टर पकडला

By admin | Updated: September 4, 2014 00:53 IST

औरंगाबाद : डॉक्टर असल्याचे सांगून विविध वॉर्डांतील रुग्णांशी संवाद साधणाऱ्या तरुणास रुग्णाच्या नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

औरंगाबाद : डॉक्टर असल्याचे सांगून विविध वॉर्डांतील रुग्णांशी संवाद साधणाऱ्या तरुणास रुग्णाच्या नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात घडली.प्रकाश प्रल्हाद वानखेडे (रा.बेगमपुरा)असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. घाटीचे प्रभारी वैैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांनी सांगितले की, प्रकाश हा घाटीच्या विविध वॉर्डांत फिरून रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर असल्याचे सांगतोे, तसेच तुमच्यावरील उपचार मोफत करून देतो, असे सांगून तो रुग्णांच्या नातवाईकांकडून पैैसे उकळतो. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी त्याच्याविरोधात यापूर्वी आलेल्या आहेत, तसेच निवासी वैैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे सांगून तो रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैैसे उकळतो. निवासी वैैद्यकीय अधिकारी डॉ. हिना खान यांनी त्याला यापूर्वी पकडले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तो पुन्हा विविध वॉर्डांत फिरत असतो. मदत करीत असल्याचे दाखवून तो आपला उद्देश साध्य करतो. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नेत्ररोग विभागाच्या वॉर्डात तो एका रुग्णाच्या लहान बालिकेजवळ जाऊन तिच्याशी बोलू लागला. तिच्या नातेवाईकांनी त्यास हटकताच तो तेथून दुसऱ्या रुग्णाशी संवाद साधू लागला. ओळख नसताना हा माणूस विनाकारण संवाद साधत असल्याचे त्या महिलेने नातेवाईकांस सांगितले, तेव्हा त्यांनी त्यास पकडून चांगलाच चोप दिला आणि मेडिकल पोलीस चौकीत नेले. तेथून त्यास वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात नेण्यात आले. वैैद्यकीय अधीक्षक डॉ. मगरे यांनी ही घटना बेगमपुरा पोलीस ठाण्याला कळवली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चार वर्षांपूर्वी त्याच्यावर घाटीत एक आॅपरेशन झाले, तेव्हा तो दोन ते तीन महिने अ‍ॅडमिट होता. यावेळी त्याने प्रत्येक वॉर्डातील कामकाजाचा बारकाईने अभ्यास केला. डॉक्टरांचा राऊं ड केव्हा होतो हे त्यास चांगले माहीत आहे. रुग्णांना गोड बोलले की, त्यांचा विश्वास सहज संपादन करता येतो, हे त्याने चांगलेच हेरले आहे.