शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वाडी पाणीपुरवठा योजना जूनअखेर होणार कार्यान्वित

By admin | Updated: March 20, 2016 01:01 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड नांदेड शहरालगत असणाऱ्या वाडी (बु) ला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून १७ कोटी १७ लाख रूपयांची योजना राबविण्यात येत आहे़

श्रीनिवास भोसले, नांदेडनांदेड शहरालगत असणाऱ्या वाडी (बु) ला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून १७ कोटी १७ लाख रूपयांची योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून सदरील योजना जूनअखेर कार्यान्वित होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली़ वाडी बु़ आणि परिसरातील पाणीपातळी खालवल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या १७ कोटी रूपयांच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे़ सदरील योजनेतील पंपगृहाचे काम पूर्ण झाले असून उद्धरणनलिकेच्या पाईपलाईन अंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे़ एकूण ४०५० मीटरपैकी जवळपास ३२०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे़ महापालिका हद्दीत येणाऱ्या ४०० मीटर पाईप अंथरण्याचे काम शिल्लक आहे़ शुद्ध जल बँ्रच उद्धरण -नलिका आणि शुद्ध जल गुरूत्ववाहिनीचे काम ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ नवी वाडी येथील शाळेच्या पाठीमागे उभारण्यात येत असलेल्या मुख्य संतुलन टाकीसह जागृत हनुमाननगर आणि लोकमित्रनगर येथील सलोह जलकुंभाचे आरसीसी काम पूर्ण झाले आहे़ तर वाडी मूळ गावातील जलकुंभाचे काम सुरू आहे़ तसेच या योजनेअंतर्गत वितरण व्यवस्थेकरिता एकूण ५४ कि़मीची पाईपलाईन मंजूर असून यातील ४७ किलोमीटर पाईपलाईन अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे़ या योजनेतील पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते लगेच दुरूस्त करून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे़ दरम्यान, या योजनेत वाढीव पाईप लाईनकरीता निधीकरीता मजिप्रातर्फे सर्वेक्षण करून वाढीव निधीचा प्रस्ताव तयार केला आहे़ योजनाच पर्याय : वाडीसह परिसरातील नगरांना पाणीपुरवठा योजनेशिवाय पर्याय नाही़ या भागातील पाणीपातळी ७०० ते १२०० फूट खोल गेली आहे़ सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या कामांना गती देवून या भागातील नागरिकांना जूनअखेरपर्यंत पाणी देण्याचा प्राधिकरणच्या अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराचा प्रयत्न आहे़