शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉलीबॉल खेळाडूंचा ‘भाईचारा’

By admin | Updated: November 14, 2015 00:51 IST

महेश पाळणे , लातूर क्रीडा क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की, यात जाती-पातींच्या गोष्टींना थारा नसतो. खांद्याला खांदा लावत विजयासाठी खेळाडू धडपडत असतात

महेश पाळणे , लातूरक्रीडा क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की, यात जाती-पातींच्या गोष्टींना थारा नसतो. खांद्याला खांदा लावत विजयासाठी खेळाडू धडपडत असतात. सांघिक खेळात तर एकजूटता महत्त्वाची आहे. यावरच सांघिक खेळाचा विजयरथ आगेकूच करीत असतो. दिवाळी उत्सवातही खेळाडूंचा हा एकोपा मैदानावर दिसून आला. दिवाळी पाडव्यानिमित्त क्रीडा संकुलात हिंदू-मुस्लिम खेळाडूंनी मैदानाची पूजा करून एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करून ‘खिलाडूवृत्ती’ दाखवून दिली. गुरुवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळीच्या पाडव्याला शहरातील महाराष्ट्र क्लब व न्यू फ्रेण्डस् क्लब या दोघा संघातील खेळाडूंनी मैदानावरच दिवाळी साजरी केली. एरवी स्पर्धेत खेळताना हे दोन संघ एकमेकांसमोर आल्यावर विजयासाठी धडपडत असतात. मात्र मैदानाबाहेर यांचे ऋणानुबंध कायम असते. मात्र पाडव्या दिवशी या दोन्ही संघांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. गुरुवारी सायंकाळच्या वेळी ज्येष्ठ खेळाडू शेषेराव साकोळे यांच्या हस्ते व्हॉलीबॉल मैदानाची पूजा करून फटाके फोडण्यात आले. जाती-पातींच्या भिंती तोडून खेळाडूंनी एकमेकांना मिठाई भरविली. हा आनंद खेळाडूंसाठी अविस्मरणीय होता. ही एकजूटतेची शिदोरी भविष्यात त्यांना यशोशिखर गाठण्यास नक्कीच मदत करेल.नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले खेळाडूही दिवाळीसाठी गावी आल्याने तेही मैदानावर यावेळी उपस्थित होते. यासह दोन्ही क्लबचे आजी-माजी खेळाडूही सहभागी होते. यात आझम पठाण, दत्ता सोमवंशी, व्यंकुराम गायकवाड, कृष्णा पोतदार, ललित जोशी, दिनेश खानापुरे, रियाज शेख, सिद्धार्थ भालेराव, विठ्ठल कवरे, समीर सय्यद, आफताब शेख, समीर शेख, ऐतेशाम शेख, सलीम शेख, साजिद सय्यद, प्रल्हाद सोमवंशी, शोएब शेख यासह महिला खेळाडूंचीही हजेरी होती. एकंदरित, या सणात खेळाडूंनी संघ भावनेने मैदानावर दिवाळी साजरी केल्याने त्यांच्या खिलाडूवृत्तीसह राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले.