शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST

आडूळ : मागील चार महिन्यांपासून आडूळ येथील महावितरण कंपनीच्या कामधकाऊ वृत्तीमुळे परिसरातील ३५ गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, ...

आडूळ : मागील चार महिन्यांपासून आडूळ येथील महावितरण कंपनीच्या कामधकाऊ वृत्तीमुळे परिसरातील ३५ गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, महावितरणचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे त्रस्त नागरिकांनी महावितरणकडे केली आहे.

आडूळ येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रातून परिसरातील ३५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, मागील चार महिन्यांपासून उपकेंद्रात सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिघाड होत असल्याने, वीजपुरवठा तीन-तीन दिवस खंडित राहत आहे. यामुळे आडूळ, रजापूर, देवगाव, ब्राह्मणगाव, गेवराई, घारेगाव, एकतुनी, दाभरूळ परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांचे हाल होत आहे. ३५ गावांतील ग्राहकांना सेवा देण्यासाठी येथील कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असून, एका लाइनमनकडे पाच ते सहा गावांचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. आडूळ गावाची लोकसंख्या बारा हजारांच्या आसपास असून, फक्त येथे एकच लाइनमन काम सांभाळत आहे. त्यामुळे सध्या वीज ग्राहकांना सुरळीत सेवा मि‌ळत नाही. त्यामुळे महावितरणने त्वरित येथील समस्या सोडवावी, अशी मागणी डॉ.गजानन आगलावे, हारुण पठाण, गणेश काळे, संदीप सुरसे, जितेंद्र वायकोस, गजानन मिरगे, विठ्ठल अंतरकर, शेख नजमोद्दीन यांनी केली.

----

मान्सूनपूर्व कामे खोळंबली

महावितरणने मान्सूनपूर्वची कामे केली नसल्याने विजेच्या खांबावर, तसेच गावातील रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने, सलग तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. या व्यतिरिक्त गावात सध्या दररोज सकाळी ६ ते ९:३० वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. त्यातही दिवसभरात किंवा रात्री-अपरात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने, ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराला वैतागले आहेत.

----

विद्युत तारा व खांब झाले जीर्ण

विद्युत उपकेंद्राचे सन १९७२ मध्ये कामकाज पूर्ण करण्यात आले, तेव्हापासून आजपर्यंतच्या ५० वर्षांच्या कालावधीत जीर्ण झालेल्या विद्युत तारा, तसेच खालून गंजलेले खांब एकदा ही बदलण्याची तसदीही महावितरणने घेतली नाही. सध्या वादळी-वाऱ्याचे दिवस असल्याने हे वीज खांब कोणत्याही क्षणी खाली कोसळून भविष्यात मोठी दुर्घटना भीती निर्माण झाली.

---

गावातील विद्युत रोहित्राची क्षमता कमी व भार जास्त असल्या कारणाने वारंवार रोहित्र जळत आहे, तसेच एका फिटरवर पाच ते सहा गावांचा अतिरिक्त भार असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे.

- महेश कुंभारे, सहायक अभियंता, महावितरण.