रमेश शिंदे , औसातालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत़ त्याचबरोबर तीन गावांतील ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होत आहे़या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे़ त्यामुळे अर्ज माघारी घ्यावा म्हणून इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे़ त्यासाठी अनेकांची मनधरणी सुरु असून आश्वासनांची खैरातही सुरु आहे़ तु माघार घेतल्यास माझा विजय नक्की असल्याचे दावे-प्रतिदावे सुरु आहेत़ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे़ या ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा संपला़ ४१ गावांत ३९१ सदस्य निवडले जाणार आहेत़या ३९१ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ११५१ अर्ज दाखल झाले होते़ यामधील ३२ अर्ज अवैध ठरले़ तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी १२ अर्ज भरण्यात आले होते़ त्यामधील १ अर्ज अवैध ठरला़ त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे़ शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे़ त्यामुळे अपक्ष किंवा कुठल्याही पॅनलमध्ये नाहीत, अशा उमेदवारांना माघार घेण्यास लावण्यासाठी फिल्डींग लावली जात आहे़ कुणाची मनधरणी केली जात आहे़ कुणाला आश्वासने दिली जात आहेत़ तर आपणच कसे निवडून येणार आहोत, याचे दावे-प्रतिदावे सांगण्यात येत आहेत़ कुठे जातीची गणिते लावून आपणच कसे सरस आहोत हे सांगितले जात आहे़ तसेच कुठे अन्य आमिषे दाखवली जात आहेत़ आजचा दिवस शेवटचा असल्यामुळे गावा-गावांत जोरदार फिल्डींग लावली जात आहेत़
उमेदवारी मागे घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांची फिल्डिंग सुरु
By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST