शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक विरोधी बँकींग धोरणाचा जोरदार निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 13:55 IST

आमचा लढा ‘पगारवाढीसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा बँकेतील पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठीचा आहे,’ असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. 

ठळक मुद्देबँकर्सची जोरदार घोषणाबाजी २१ बँकांचे ३०० शाखा राहणार दिवसभर बंद दिवसभरात सुमारे ७०० कोटीचे व्यवहार ठप्प झाले

औरंगाबाद, दि. २२ : ‘हिटलरशाही नही चलेंगी’, ‘ बड्या उद्योजकांकडील थकीत कर्ज वसुल करा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा’, ‘हब सब एक है’ अशा घोषणा देत आज २१ राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी-कर्मचा-यांनी जोरदार घोषणा दिल्या. आमचा लढा ‘पगारवाढीसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा बँकेतील पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठीचा आहे,’ असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. 

मंगळवारी देशभरातील २१ राष्ट्रीयकृत बँकांतील सुमारे १० लाख कर्मचारी व अधिका-यांनी संप पुकारला होता. त्याचा परिणाम, औरंगाबादेतील बँकिंग व्यवहारावरही दिसून आला. दिवसभरात सुमारे ७०० कोटीचे व्यवहार ठप्प झाले. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ३०० शाखांचे शटर दिवसभर उघडलेच नाही. खाजगी, सहकारी बँकांचे व्यवहार मात्र, सुरळीत चालू होते. दिवसभर बँकाबदल असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहारांना अडचणीला सामोरे जावे लागले.

युनाटेड फोरम आॅफ बॅक्स् युनियन झिंदाबाद अशा घोषणा देत सकाळी १०.३० वाजता दुधडेअरी चौकातील स्टेट बँक आॅफ इंडिया समोर बँकर्स एकवटले होते. ‘ थकीत कर्ज वसुलीसाठी संसदीय समितीच्या सुधारणा लागू करा,’ तसेच बड्या उद्योजकांकडे २ लाख ५० हजार कोटीचे थकीत कर्ज वसूल करा. या उद्योजकांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जगदीश भावठाणकर यांनी केली. 

औरंगाबादेतील राष्ट्रीयकृत बँकांचे २ हजार कर्मचारी,अधिकारी संपात सहभागी झाल्याचा दावा एआयबीओसीचे सुनील शिंदे यांनी केला. यावेळी एआयबीएचे हेमंत जामखेडकर, एनसीबीईचे महेश गोसावी यांची भाषणे झाली.  राकेश बुरबुरे यांनी जोरदार घोषणा बाजी करुन सर्वांमध्ये जोश भरला. सूत्रसंचालन रवी धामणगावकर यांनी केले. आंदोलन यशस्वीतेसाठी विजय गायकवाड, हिंदप्रकाश जैस्वाल, डि.के. देशपांडे, आनंद देवळे आदींनी परिश्रम घेतले.  

बँकर्सच्या प्रमुख मागण्या 

१) जीएसटीच्या नावाखाली वाढीव सेवा शुल्क रद्द करा.२) प्रस्तावित एफआरडीआय बील मागे घ्या.३) बँक बोर्ड ब्युरो बरखास्त करा.४) बँकांतून सर्व श्रेणीत पुरेशी नोकर भरती करा. ५) कर्मचा-यांच्या प्रलंबीत मागण्या मान्य करा.