शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सतर्क पोलिसांनी रोखला बाल विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:54 IST

एका १६ वर्षीय मुलीचा साखरपुड्यातच विवाह होणार असल्याची माहिती मिळताच सतर्क हर्सूल पोलिसांनी तात्काळ मुलीचे घर गाठले. यावेळी आपली चूक वधूपित्याच्या लक्षात आली आणि त्यांनी साखरपुडा आणि विवाहाचा कार्यक्रम रद्द केला. 

ठळक मुद्देआपल्या १६ वर्षीय  मुलीचे  एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्याने तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह उरकण्याचे ठरवले. वधूपित्याने सारवासारव करीत आज आम्ही केवळ साखरपुडा करणार आहे. मुलीचे लग्न करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ११ : एका १६ वर्षीय मुलीचा साखरपुड्यातच विवाह होणार असल्याची माहिती मिळताच सतर्क हर्सूल पोलिसांनी तात्काळ मुलीचे घर गाठले. यावेळी पोलिसांनी मुलीचे आईवडिल आणि नातेवाईकांना अल्पवयीन मुलीचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे तुम्हाला हा विवाह करता येणार नाही,असे स्पष्ट केले. यावेळी आपली चूक वधूपित्याच्या लक्षात आली आणि त्यांनी साखरपुडा आणि विवाहाचा कार्यक्रम रद्द केला. 

लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे २१ वर्ष कायद्यानुसार निश्चित करण्यात आले आहे. लग्नाच्या वेळी वधू अथवा वराचे वय कमी असेल तर तो बालविवाह मानला जातो. असा  विवाह  होणे बालविवाह कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. असे असताना आपल्या १६ वर्षीय  मुलीचे  एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्याने तिच्या आईवडिलांना लागली होती. वय वर्ष १६ हे धोक्याचे असे गमतीने म्हटले जाते. मात्र, या मुलीच्या आईवडिलांना खरेच ते धोक्याचं जाणवू लागल्याने त्यांनी तिचे लग्न ठरविले आणि आज शुक्रवारी साखरपुड्यात तिचा विवाह एका धार्मिक स्थळी उरकण्याची तयारी सुरू केली. 

हर्सूल परिसरातील फुलेनगरात हा विवाह होणार असल्याची कुणकुण हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर यांना लागली. मात्र कोणाच्या घरी विवाह होणार आहे आणि वधूपित्याचे नाव आणि पत्ताही त्यांना माहित नव्हता. असे असताना पो.नि. कल्याणकर यांनी प्रथम फुलेनगरात सध्या वेशातील पोलिसांना पाठवून असा एखादा विवाह आज होत आहे का, याबाबत खात्री केली. तेव्हा त्यांना वधूपित्याचे आणि मुलीचे नाव कळाले. त्यानंतर कल्याणकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली थेट वधूपित्याचे घर गाठले आणि  मुलीची जन्मदाखला त्यांना सादर करण्याचे सांगितले. तेव्हा वधूपित्याने सारवासारव करीत आज आम्ही केवळ साखरपुडा करणार आहे, मुलीचे लग्न करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

बालविवाह लावणे  कायद्याने गुन्हा आहे,असा सज्जड दम देत पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. मुलीचे वय शिकण्याचे असल्याने तिला शिकवून तिच्या पायावर उभे करा,असा सल्ला त्यांनी दिला. शिवाय वधूपित्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावेळी मुलीच्या पित्याने आणि नातेवाईकांनी पोलिसांचे म्हणने मान्य करीत सध्या त्यांच्या कन्येसाठी वर संशोधन आणि साखरपुडा करणार नसल्याची ग्वाही पोलिसांना दिली.