शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ महोत्सव पावसाळ्यानंतर?

By admin | Updated: June 22, 2016 00:55 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात ४ वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेण्यात आला नाही. यावर्षी पावसाळ्यानंतर वेरूळ महोत्सव घेण्याचा निर्णय

औरंगाबाद : मराठवाड्यात ४ वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेण्यात आला नाही. यावर्षी पावसाळ्यानंतर वेरूळ महोत्सव घेण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात ३ दिवस वेरूळ महोत्सव घेण्याचा संभाव्य विचार आजच्या बैठकीत झाला. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर महोत्सवाला ब्रेक लागू शकतो. देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी १९९४ पासून वेरूळ येथे महोत्सव घेण्यास सुरुवात झाली. वेरूळ येथे तब्बल १४ वर्षे हा महोत्सव साजरा करण्यात आला. वेरूळ महोत्सवात कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली. २००८ मध्ये वेरूळ महोत्सव मुंबई बॉम्बस्फोटामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर २ वर्षे वेरूळ महोत्सव झाला नाही. २०११ मध्ये ४ दिवस सोनेरी महल येथे महोत्सव घेण्यात आला. त्या महोत्सवावर १ कोटी ४५ लाखांचा खर्च झाला. २०१२ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेतला गेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे २०१३ ते २०१५ या ३ वर्षातही प्रशासनाने वेरूळ महोत्सव घेण्याचा विचार केला नाही. गेल्यावर्षी मुंबईला महोत्सव घेण्याप्रकरणी बैठक झाली होती; परंतु जिल्हा प्रशासनाने महोत्सव का रद्द केला, याचे कारण आजपर्यंत जाहीर केलेले नाही. यावर्षीदेखील महोत्सवाबाबत अनेक शंका आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे प्रशासनाने वेरूळ महोत्सव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वेरूळ महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक अध्यक्ष विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत झाली. आॅक्टोबरमध्ये कोजागरी पौर्णिमेपासून ३ दिवस हा महोत्सव घेतला जावा, तसेच वेरूळ आणि सोनेरी महल या ठिकाणी महोत्सव घेण्यावर चर्चा झाली. वेरूळ महोत्सवासाठी सुमारे २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या बैठकीला उपायुक्त जितेंद्र पापळकर, पर्यटन विभागाचे चंद्रशेखर जैस्वाल, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थिती होती.