शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

औरंगाबादकरांसाठी घाटीतील प्रयोगशाळा २४ तास कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यास ३-३ दिवस लागतात. परंतु, औरंगाबादेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यास ३-३ दिवस लागतात. परंतु, औरंगाबादेत अवघ्या १२ ते १८ तासांत म्हणजे एका दिवसाच्या आतच कोरोनाचा अहवाल मिळतो. त्यातून निगेटिव्ह नागरिक सुटकेचा नि:श्वास सोडतात, तर पाॅझिटिव्ह रुग्णांवर लवकर उपचार सुरु होणे शक्य होते. हे सगळे शक्य होत आहे ते फक्त घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेमुळे (व्हीआरडीएल). ही प्रयोगशाळा औरंगाबादकरांसाठी २४ तास सुरु असते. त्यामुळेच या प्रयोगशाळेने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर औरंगाबादेत कोरोना तपासणीची कोणतीही व्यवस्था नव्हती. घाटीत एनएबीएल अ‍ॅक्रिडेट टीबी लॅब होती. याठिकाणी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे यांनी प्रयत्न करून विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) ही स्वॅब तपासणी करणारी प्रयोगशाळा सुरु केली. या प्रयोगशाळेला पुणे येथील ‘एनआयव्ही’ची मान्यता मिळाली. २९ मार्च २०२० रोजी ही प्रयोगशाळा सुरु झाली. सुरुवातीला मराठवाड्यात कोरोनाच्या निदानासाठी कुठेही स्वॅब तपासणी होत नव्हती. तेव्हा ६ जिल्ह्यांतून येणारे संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घाटीतील ‘व्हीआरडीएल’मध्ये तपासण्यात येत होते.

गतवर्षी एप्रिल, मे महिन्यात जेव्हा अन्य शासकीय प्रयोगशाळेत रोज २०० ते ३०० स्वॅब तपासणी होत असे, त्यावेळी औरंगाबादेत एक हजार स्वॅबची तपासणी होत होती. ही प्रयाेगशाळा २४ तास सुरु असते. कोरोनाची लागण झाली की नाही, याचा अहवाल एकाच दिवसात मिळतो, तो फक्त घाटीतील प्रयोगशाळेमुळे. याठिकाणी आरटीपीसीआर तपासणीसाठी ७ यंत्रे आहेत. एका दिवसात ४ हजार तपासण्या करण्याची क्षमता या प्रयोगशाळेची आहे. विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) ही घाटीतील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या अंतर्गत येते. या विभागाच्या प्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे आहेत. राज्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख १९ हजार ३८८ आरटीपीसीआर तपासण्या या घाटीतील ‘व्हीआरडीएल’मध्ये झाल्या आहेत. या प्रयोगशाळेसाठी अधिष्ठाता, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे प्रयोगशाळा हे काम करू शकली. जिल्हा प्रशासनाने प्रयोगशाळेसाठी किटची कधीही कमतरता पडू दिली नाही.

-------

आरटीपीसीआर तपासणी

प्रयोगशाळा - एकूण तपासण्या

१) घाटी, औरंगाबाद - ३,१९,३८८

२) बीजेजीएमसी, पुणे - ३,११,८९८

३) एनआयव्ही, पुणे - ३,०४,३२६

४) आरसीएसएम जीएमसी, कोल्हापूर - २,८८,२८८

५) एमएमटीएच, नवी मुंबई - २,७९,९५३

६) आयजीएमसी, नागपूर - २,७३,२७९

७) जीएमसीएच नागपूर - २,३५,६१२

-----

फोटो ओळ

- घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी करताना कर्मचारी.

- सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे.