शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालय ‘आॅक्सिजन सिलिंडर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:15 IST

घाटी रुग्णालयात अत्याधुनिक आॅक्सिजन यंत्रणा (सेंट्रल आॅक्सिजन) बसविण्यात आली आहे; परंतु ही यंत्रणा अवघ्या काही वॉर्डांपुरती मर्यादित आहे. इतर अनेक वॉर्डांत रुग्णास आॅक्सिजनची आवश्यकता भासल्यावर धावपळ करून आॅक्सिजन सिलिंडर लावला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात अत्याधुनिक आॅक्सिजन यंत्रणा (सेंट्रल आॅक्सिजन) बसविण्यात आली आहे; परंतु ही यंत्रणा अवघ्या काही वॉर्डांपुरती मर्यादित आहे. इतर अनेक वॉर्डांत रुग्णास आॅक्सिजनची आवश्यकता भासल्यावर धावपळ करून आॅक्सिजन सिलिंडर लावला जातो. बालकक्षही सिलिंडरच्या जोरावर सुरू आहे. अनेकदा सिलिंडर पोहोचण्यास विलंब होतो. हा प्रकार रुग्णांच्या जिवावर बेतण्याचा धोका असल्यामुळे आॅक्सिजनच्या सुविधेत वाढ होण्याची आवश्यकता आहे.घाटीतील मेडिसिन विभागात सेंट्रल आॅक्सिजन सिस्टिम आहे. येथे एका टँकमधून अतिदक्षता व आयसीसीयू, ‘एमआयसीयू’ला आॅक्सिजन पुरवठा केला जातो. सर्जिकल इमारतीमधील आॅपरेशन थिएटरमध्ये आॅक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक टँक आहे. या दोन्ही टँकमध्ये लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा केला जातो. तेथून पाईपद्वारे रुग्णांना आॅक्सिजन पुरविला जातो.या यंत्रणेत बिघाड झाल्यास जम्बो सिलिंडर उपलब्ध असतात; परंतु याच जम्बो सिलिंडरच्या जोरावर इतर वॉर्डांतील रुग्णांना आॅक्सिजन मिळत आहे. अपघात विभागाच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या शल्यचिकित्सा अतिदक्षता विभागातील रुग्णांना आॅक्सिजन पुरवठा करण्यासाठी सेंट्रल आॅक्सिजन सिस्टिम आहे; परंतु यासाठीही जम्बो सिलिंडरचा वापर करण्याची वेळ येत आहे. जम्बो सिलिंडर लावून या विभागात पाइपद्वारे आॅक्सिजन दिले जाते. वारंवार सिलिंडर लावण्याची कसरत कर्मचाºयांना करावी लागते. थेट लिक्विड आॅक्सिजनच्या टँकमधून पुरवठा झाल्यास ही कसरत कमी होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांकडून व्यक्त होत आहे.