शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात ‘एक का सौ’

By admin | Updated: November 14, 2015 00:53 IST

मोबीन खान , वैजापूर ‘एक लाख लगाओ और चालीस दिन में एक करोड लेकर जाओ’ हे ऐकून कोणाच्याही तोंडाला लालसेचा पाझर फुटणारच. गेल्या १५ दिवसांपासून वैजापूर शहरात

मोबीन खान , वैजापूर‘एक लाख लगाओ और चालीस दिन में एक करोड लेकर जाओ’ हे ऐकून कोणाच्याही तोंडाला लालसेचा पाझर फुटणारच. गेल्या १५ दिवसांपासून वैजापूर शहरात एका भोंदूबाबाने आपल्या या अनोख्या फंद्यात करोडो रुपयांचा चुना वैजापूरकरांना लावला आहे. विशेष म्हणजे इतकी मोठी फसवणूक झाल्यानंतरही कोणी पोलिसांकडे केवळ बदनामीमुळे तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांनाही या घटनेविषयी बघ्याची भूमिका पार पाडावी लागत आहे.दररोज विविध वृत्तपत्रांत व टीव्हीवर चोरी व फसवणुकीच्या घटना आपण बघत आहोत. माहीत असतानाही झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अशा सूचनांकडे माणूस दुर्लक्ष करतो अन् याच गोष्टीचा काही ठकबाज फायदा उचलतात. गेल्या पंधरा दिवसांपासून वैजापूर शहरातही असाच फसवणुकीचा खेळ जोरात सुरू आहे. नाशिक येथील एका भोंदू बाबाने वैजापूर येथील काही पंटरांना हाताशी धरून पैशांचा पाऊस पाडण्याचा धंदा सुरू केला आहे. ‘एक लाख लगाओंगे तो एक करोड मिलेंगा’ असा हा फंडा असून यासाठी काही नियम व अटी भोंदू बाबाने ठेवलेल्या आहेत. पैसे दहापट पाहिजे तर त्यासाठी पाच व्यक्तींनी प्रत्येकी एक लाख याप्रमाणे पाच लाख रुपये बाबाकडे जमा करावे लागतील. एक लाख नसेल तर दहा व्यक्तींनी प्रत्येकी ५० हजार प्रमाणे पाच लाख बाबाकडे जमा करावेत. पैसे जमा केल्यानंतर म्हणेल त्या ठिकाणी त्या पैशावर बाबा विधी करून चाळीस दिवसांत पाच करोड देण्याची बोळवण करीत आहे. जर कोणी शंका उपस्थित केली तर पैसे घेऊन माझ्यासोबत उज्जैनला जाऊन विधीसाठी साहित्य खरेदी करण्याची अट घालत आहे. विशेष म्हणजे या कामात स्थानिक पंटरांचा मोठा हस्तक्षेप असल्यामुळे अनेक लोक फसले जात आहेत. मिळालेल्या सूत्रानुसार १५ दिवसांत या भोंदूबाबाने करोडो रुपये या लोकांकडून उकळले आहेत. आपण फसल्याचे कळून चुकल्यानंतरही केवळ बदनामीच्या धाकाने कोणी पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नसल्याने पोलिसांनाही माहिती असतानाही बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे.