शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ बँक विजयाचा आगामी निवडणुकांमध्ये होणार लाभ

By admin | Updated: June 23, 2016 00:11 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी भरलेला ८९२ कोटींचा पीक विमा मंजूर करवून आणल्याचे सांगत ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी भरलेला ८९२ कोटींचा पीक विमा मंजूर करवून आणल्याचे सांगत ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ बँक निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. आपणच बँक व्यवस्थीत चालवू शकतो, हा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला. हा मुद्दा प्रभावी ठरल्याने सभासदांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलला मतदान करत सर्वच्या सर्व जागा त्यांच्या ताब्यात दिल्या तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पुरस्कृत वैद्यनाथ विकास पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही.जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्व बँकामध्ये वैद्यनाथ बँकेची एक वेगळीच ओळख असून सभासदांच्या अग्रस्थानी आहे. सध्या या बँकेची साडेतेराशे कोटींची वार्षीक उलाढाल आहे. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ४१ शाखांचा विस्तार झाला होता. त्यामुळे त्यांचे अनेक वर्षे वैद्यनाथ बँकेवर वर्चस्व होते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच बँकेसाठीची निवडणूक होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले होते. वैद्यनाथ बँक निवडणुकीत पंकजा मुंडे पुरस्कृत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे १७ तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पुरस्कृत वैद्यनाथ विकास पॅनलचे १७ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. ही निवडणूक कोण जिंकते, कोण बँकेवर ताबा मिळवितो याची उत्सुकता मंगळवारी रात्रीपर्यंत कायम होती. दरम्यान, पहिल्या ते अखेरच्या पाचव्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे यांचा लोकसेवा पॅनल कायम आघाडीवरच होता. जनसेवा पॅनलने सरासरी दहा हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत उमेदवार असलेल्या खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी सर्वाधिक १३ हजार ३६७ मते मिळवली. खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनीही निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली होती. त्याचे फळ मतदानाच्या रुपातून समोर आले. जनसेवा पॅनल सुरुवातीपासून आघाडीवर असल्याने फेरीगणीक कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढतच होता. तिसऱ्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत विजयाचा जल्लोष साजरा केला. संधीसाधू लोकांना मतदारांनी या निमित्ताने धडा शिकवला, अशी प्रतिक्रीया भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली.परळी आणि परिसरामध्ये वैद्यनाथ बँकेची पाळेमुळे रुजलेली असून या विजयामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बँकेच्या माध्यमातून चांगली प्रतिमा बनवून आगामी जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुकीत लाभ होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.