लस घेतल्यामुळे कोरोनाची लक्षणे
औरंगाबाद : लसीचे दोन डोस घेतल्यावर स्वत:ला करोनाची लागण झाली होती, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. लस घेतल्यामुळे माझ्यात कोरोनाची लक्षणे सौम्य होती, त्यामुळे काही त्रास झाला नाही. आठ–दहा दिवसात कामावर देखील रुजू झाले. लस घेतल्यामुळे करोनाची लक्षणे सौम्य होतात, त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सारी आजाराचे १८ रुग्ण सापडले
औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग वाढत असतानाच सारीच्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सारीतील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सोमवारी शहरात सारीचे १८ रुग्ण आढळून आले. कोरोना चाचणीतून यापैकी ९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.