शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

न्यूमोनिया मृत्यू रोखण्यासाठी १२ जुलैपासून प्रत्येक नवजात शिशूला लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST

औरंगाबाद : न्यूमोनियामुळे होणारे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेतर्फे १२ जुलैपासून प्रत्येक नवजात शिशूला न्यूमोनियाविरोधी लस (न्यूमोकोक्कल काँज्युगेट व्हॅक्सिन- पीव्हीसी) ...

औरंगाबाद : न्यूमोनियामुळे होणारे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेतर्फे १२ जुलैपासून प्रत्येक नवजात शिशूला न्यूमोनियाविरोधी लस (न्यूमोकोक्कल काँज्युगेट व्हॅक्सिन- पीव्हीसी) देण्याचा निर्णय घेतला आहे.

लहान मुलांमध्ये न्यूमोनिया होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे अनेकदा योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूही होतो. न्यूमोनियामुळे होणारे मृत्यूचे सत्र रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. प्रत्येक नवजात शिशूला अत्यंत महागडी लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयांना लसही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवजात शिशूंमध्ये रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे अनेकदा ‘स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया बॅक्टेरिया’ची लागण होते. या बॅक्टेरियाचा खात्मा करण्यासाठी बाजारात ५ हजार रुपये किमतीची ‘न्यूमोकोकल’ व्हॅक्सिन उपलब्ध आहे. अनेक खाजगी डॉक्टर याचा मोठ्या प्रमाणात वापरही करतात. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या मुलांना ही लस उपलब्ध होत नाही. शासकीय कार्यालयांमध्ये अनेकदा उपलब्ध औषधींचा डॉक्टरांकडून वापर होतो. प्रत्येक नवजात शिशूला न्यूमोनिया होऊ नये म्हणून लसीचे तीन डोस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयांना यासंदर्भात निर्देश आणि लसीचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिकेला दोन हजार लसींचा साठा शासनाकडून प्राप्त झाला असून, १२ जुलैपासून प्रत्येक नवजात शिशूला लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया होण्याचे प्रमाण १२ टक्के आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने व्यापक प्रमाणात उपाययोजना सुरू केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर दीड महिन्याचा शिशू असेल तरच लस दिली जाईल. यापुढे जन्म घेतलेल्या शिशूला लस देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. साधारणपणे औरंगाबाद शहरात दरवर्षी २० हजार बालके जन्माला येत असतील, तर त्यादृष्टीने लसीचे नियोजन राहणार आहे.

चौकट..

लहान मुलांमध्ये न्यूमोनिया होण्याचे प्रमाण १२ टक्के

दरवर्षी २० हजार बालकांच्या लसींचे नियोजन

दोन हजार लसींचा साठा महापालिकेला शासनाकडून प्राप्त

चौकट...

असे होईल लसीकरण

दीड महिना- पहिला डोस

तीन महिने- दुसरा डोस

नऊ महिने- तिसरा डोस