शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

यंदाही मराठवाड्यात होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

By admin | Updated: May 24, 2016 01:25 IST

विकास राऊत , औरंगाबाद यंदा भरपूर पावसाचे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत; परंतु जर अंदाज ढगात विरले तर पुन्हा अडचण नको म्हणून प्रशासनाने मराठवाड्यात

विकास राऊत , औरंगाबादयंदा भरपूर पावसाचे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत; परंतु जर अंदाज ढगात विरले तर पुन्हा अडचण नको म्हणून प्रशासनाने मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आतापासूनच तयारी पूर्ण करून ठेवली आहे. गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. कॅबिनेटने मंजुरी दिल्यावर जूनमध्येच या प्रयोगाचा निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी निम्मा पावसाळा उलटल्यानंतर म्हणजेच ४ आॅगस्ट रोजी मराठवाड्यात या प्रयोगाला सुरुवात झाली होती. प्रयोगाला उशीर झाल्याने त्यावेळी प्रयोग फसला होता.विशेष म्हणजे मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची गतवर्षी आॅक्टोबरमध्ये सांगता झाल्यानंतर त्यासाठी लागणारे सी-बँड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात आली असली तरी पायाभूत यंत्रणेचा पूर्ण सांगाडा अद्याप विभागीय आयुक्तालयातच आहे. त्यामुळे यंदा प्रयोगाला फारशी जुळवाजुळव करावी लागणार नाही. गतवर्षी १०० तासांवर १०० तास मोफत, असा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ‘ख्याती वेदर मॉडिफिकेशन’ या कंपनीसोबत कंत्राट करण्यात आले होते. ११० तासांच्या आसपास विमानाने प्रयोग करून ९५० मि. मी. पर्यंत पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला होता. कराराच्या ५० टक्केच उड्डाण केले. १३ कोटी ५० लाख रुपयांचा जास्तीचा खर्च कंपनीला द्यावा लागला. ढगांनी दगा दिल्यामुळे हे नुकसान शासनाला सोसावे लागले. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग (पान २ वर)‘सी बँड डॉप्लर’ रडार व पावसासाठी वापरण्यात येणारे सोडियम अँड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’, ढगांची गर्दी तपासून त्या दिशने ‘एरोसोल्स’(नळकांड्या) सोडण्यात येतात.४ ‘सी बँड डॉप्लर’ या रडारच्या साह्याने ढगांचे स्कॅनिंग केले जाते. त्या स्कॅनिंग इमेजमध्ये (फोटो) किती पाणी आहे, ते पडण्याची क्षमता कशी आहे.४किती किलोमीटरच्या रेंजमध्ये ते पाणी पडेल, याचा अंदाज लावण्यात येतो. त्यानुसार विमानाच्या साह्याने नळकांड्या ढगात सोडण्यात येतात आणि तेथे ढग दाटून येऊन त्या भागात पावसाच्या सरी होऊन बरसतात. ४जगभरामध्ये तीन ते चार देशांमध्ये या महागड्या तंत्राने पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो.राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अद्याप कुठलेही अधिकृत पत्र कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आलेले नाही. गेल्या वर्षी पायाभूत सुविधांसाठी तयार करण्यात आलेली यंत्रणा सज्ज आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनसाठी गेलेला वेळ यावर्षी प्रयोग करण्याचे ठरल्यास लागणार नाही. सगळे निर्णय मुंबईतून होणार असल्यामुळे विभागीय प्रशासन यंत्रणासोबत असेल, असे महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.