जळकोट : जळकोट शहरातील आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून, रविवारी जिल्हा परिषदचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले़ नागपूरचे भंते सरन्कर यांची प्रमुख उपस्थिती होती़ पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव धुळशेटे गुरुजी होते़ मंचावर अविनाश कांबळे, खादर लाटवाले, रमेश देशमुख, भगवान गायकवाड, सरपंच रामराव शिंगाडे, उपसरपंच सुभाष धुळशेट्टे, चेअरमन, गणपतराव धुळशेट्टे, माजी जि़प़सदस्य उस्मान मोमिन, पिराजी कोकणे, अॅड़शाम गवळे, प्राचार्य संपत शिंगाडे, दिलीप शिंगाडे, श्रावण गायकवाड, प़स़सदस्य ललिता गवळे, भाऊराव गवळे, व्यंकट पवार, शाम डांगे, संग्राम गायकवाड, विजय शिंगाडे, दिगंबर गायकवाड, अर्जुन वाघमारे, डॉ़देवणीकर, बालाजी केंद्रे, शेखर डोंगरे, अशोक कारभारी, डॉ़ बलांडे, अशोक डांगे, राजू वाघमारे, भागिरथी गायकवाड, सिद्धार्थ कोकणे, जे़जे़ कांबळे आदींची उपस्थिती होती़ यावेळी माजी सभापती मन्मथ किडे म्हणाले, डॉ़बाबासाहेब आंबेडकर म्हणजे, ज्ञानाचे प्रतिक आहे. ते आधुनिक भारताचे जनक आहेत़ संपूर्ण जगाला त्यांच्या विचारांची गरज आहे़ जगाला शांतेचा संदेश बुद्धाने दिला़ बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध मिळाले, असेही ते म्हणाले़ तहसीलदार अविनाश कांबळे यावेळी म्हणाले, बाबासाहेबांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केले आहे़ त्यांच्या घटनेवर सध्या देश चालतो आहे़ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे देश टिकून आहे. कार्यकर्त्यांनी त्यांनी दिलेल्या तत्वाचा अंगिकार करणे आवश्यक आहे़ प्रास्ताविक सी़एम़ कांबळे यांनी केले़ डॉ़देवणीकर, संपत शिंगाडे, व्यंकटराव गवळे गुरुजी, दिलीप शिंगाडे, श्रावण गायकवाड यांची समयोचित भाषणे झाली़ पुतळ्याचे शिल्पकार हंसराज गवळे यांचे कौतुक करण्यात आले़ सेवानिवृत्त शिक्षक किसनराव धुळशेट्टे यांनी स्वखर्चाने हा पुतळा उभारला असून, त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी थाटात झाला़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड़शाम गवळे, पिराजी कोकणे, उमाकांत गवळी, सुधाकर कांबळे यांनी परिश्रम घेतले़
डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
By admin | Updated: February 2, 2015 01:13 IST