शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

अवैैध प्रवासी वाहनांनी चाकूरच्या रस्त्यावर कोंडी

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

चाकूर : एस़टी़महामंडळातील कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर एस़टी़ न थांबविता इतरत्र बस थांबवून प्रवासी घेत असल्याने काही प्रवाशांची गैैरसोय होत आहे़

चाकूर : बहुजन हिताय्, बहुजन सुखाय असे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांची सोय करू पाहणाऱ्या एस़टी़महामंडळातील कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर एस़टी़ न थांबविता इतरत्र बस थांबवून प्रवासी घेत असल्याने काही प्रवाशांची गैैरसोय होत आहे़ तसेच थांबा सोडून गाड्या इतरत्र लावत असल्याने स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे़चाकूर तालुक्यातील चापोली, लातूर रोड, घरणी आष्टा, म्हाळंग्रा या बसस्थानकावर असा प्रसंग अधिक प्रमाणात दिसून येतो़ एस़टी़चा प्रवास बहुजन हिताय्, बहुजन सुखाय् या ब्रिद वाक्याप्रमाणे सुखद प्रवास असल्याचे समजून ज्येष्ठ नागरिक एस़टी़लाच प्राधान्य देतात़ सध्या उन्हाळी सुटी व लगीनसराईचे दिवस असल्याने बरेच नागरिक सहकुटुंब फिरायला जातात तर काही नागरिक नातेवार्ईक मित्र परिवारांच्या भेटीला जातात़ त्यातच लगीनसराई असल्यामुळे लग्नाला जाण्यासाठीही ग्रामीण भागातून एस़टी़चाच आधार घ्यावा लागत आहे़ दिवसेंदिवस एस़टी़च्या प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे़ परंतु, महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ चाकुरातील बसस्थानकात सायंकाळी ६ नंतर बसेस जात नाहीत़ पर्यायाने प्रवाशांना अवैैध प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ तालुक्यातील तेलगाव पाटी ते म्हाळंग्रा हा राज्यमार्ग लातूर ते नांदेड असा आहे़ चापोली येथील बऱ्याच बसेस थांब्यावर थांबत नाहीत़ त्यामुळे हिंप्पळनेर, आनंदवाडी, आजनसोंडा, शंकरवाडी, उमरगा कोर्ट, हणमंत जवळगा आदी गावांतील प्रवासी एस़टी़अभावी ताटकळत बसतात आणि एस़टी़ आली तरी बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांना अवैैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे़ तालुक्यात लातूर रोड येथे दिवसरात्र २० ते २५ रेल्वे गाड्या धावतात़ लातूर रोड परिसरात मोहनाळ, कडमुळी, सावरगाव, सांगवी येथील रेल्वेतून ये-जा करणारे प्रवाशांना बसेस अपुऱ्या पडतात़ परिणामी, खाजगी अवैैध प्रवासी वाहतूक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ आष्टा मोड हे चौरस्त्यावरील गाव असून, येथून नांदेड, लातूर, उदगीर, रेणापूर या तालुक्याकडे जाता येते़ परंतु, येथील थांब्यावर बस थांबत नाहीत़ तसेच आष्टामोड जवळ जानवळ, गांजूर ही गावे आहेत़ आता बसेस स्थानकात़़़याबाबत चाकूरचे आगारप्रमुख एम़बी़जाधव यांच्याशी संपर्क साधला असता बसस्थानकात बस थांबत नसतील तर संबंधित वाहक-चालकांना सूचना देण्यात येतील़ तरीही प्रश्न तसाच राहिला तर प्रवाशांनी आगारप्रमुखांशी संपर्क साधावा़ त्यानुसार संबंधित वाहक-चालकांवर कार्यवाही केली जाईल़