शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आता ‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:04 IST

विजय सरवदे औरंगाबाद : कोरोनाने संपूर्ण जगाचा चेहरामोहराच बदलला आहे. कोरोनाचा विषाणू संपुष्टात येईल की नाही, हे कोणीही ठामपणे ...

विजय सरवदे

औरंगाबाद : कोरोनाने संपूर्ण जगाचा चेहरामोहराच बदलला आहे. कोरोनाचा विषाणू संपुष्टात येईल की नाही, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, त्यापासून प्रत्येकाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. ‘व्हायरॉलॉजी’ क्षेत्रात कारकीर्दीसाठी भरपूर संधी असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मिती केली जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘डीएनए बार कोडिंग सेंटर’मध्ये गेल्या वर्षी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘सीएसआर फंडा’तून कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली. या प्रयोगशाळेच्या उद्‌घाटन समारंभावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संकल्प जाहीर केला होता की, आम्ही एवढ्यावरच थांबणार नाहीत, तर विषाणूचा सखोल अभ्यासक्रम सुरू करून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल. त्यानुसार त्यांनी विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना पाठविला होता. त्यांच्याकडून ‘ग्रीन’ सिग्नल मिळाल्यानंतर तो प्रस्ताव विद्या परिषदेसमोर ठेवला. विद्या परिषदेनेही त्यास मंजुरी दिली.

चालू शैक्षणिक वर्षातच हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. पहिली बॅच १५ विद्यार्थ्यांची असेल. विद्यापीठ परिसरात ‘डीएनए बार कोडिंग व कोरोना विषाणू चाचणी’ प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र इमारत उभारील जात आहे. त्यात अद्ययावत ‘व्हायरॉलॉजी लॅब’ उभारली जाणार असून, हा अभ्यासक्रम तिथेेच शिकविला जाणार आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी, तसेच प्रात्यक्षिक, विश्लेषण, संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठातील संबंधित तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच काही बाहेरच्या तज्ज्ञांना पाचरण करण्यात येणार आहे.

चौकट.....

देशातील हे पहिलेच विद्यापीठ

यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपण विद्यापीठाचा मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसरात दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरू केल्या. देशातील हे पहिले विद्यापीठ आहे की, ज्याने सामाजिक बांधीलकी जपत दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरू केल्या. एवढ्यावरच न थांबता कोरोनासारखे नवनवीन विषाणू येत आहेत. त्यांचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. या उद्देशाने विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका सुरू केला जात आहे. उस्मानाबाद कोरोना टेस्टिंग लॅबचे मुख्यमंत्र्यांनी उद्‌घाटन केले होते. त्यावेळी विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निधी द्यावा, असे मी त्यांंना बोललो होतो. शासनाची वाट न बघता आपण सध्या पदविका अभ्यासक्रम सुरू करत आहोत.