शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या समितीची पुण्यात बैठक

By admin | Updated: October 9, 2016 01:07 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमलेल्या एका चौकशी समितीच्या बैठका पुण्यामध्ये घेण्यात येत असल्याने विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमलेल्या एका चौकशी समितीच्या बैठका पुण्यामध्ये घेण्यात येत असल्याने विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर बैठका घेण्याचे प्रयोजन काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाच्या फंडातून नेमलेल्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या नियमित करण्यासाठी विद्यापीठाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी विरोध दर्शविला होता. तसेच या प्राध्यापकांना नियमबाह्यरीत्या वेतनवाढ देण्यात आल्याचा आक्षेप घेऊन विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जुलै महिन्यात उपोषणही केले होते. याप्रकरणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एन. मालदार, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीची पहिली बैठक विद्यापीठात १९ जुलै रोजी झाली. ६ आॅगस्ट रोजी समितीची दुसरी बैठक पुण्यात झाली. गुरुवार, ६ आॅक्टोबर रोजी समितीची तिसरी बैठक पुण्यातच झाली. या बैठकीला विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे गेले होते. चौकशी समितीच्या बैठका पुण्यामध्ये कशासाठी घेण्यात येत आहेत, असा प्रश्न डॉ. भालेराव यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्येही या प्रकारामुळे नाराजी आहे. विद्यापीठाने नेमलेली चौकशी समिती असेल तर समितीच्या बैठका विद्यापीठातच व्हायला हव्यात, असे मत व्यक्त केले. यासंदर्भात डॉ. भालेराव यांनी डॉ. जब्दे यांची भेट घेतली असता त्यांनी बैठक पुण्यात घेण्याचे कारण स्पष्ट केले नसल्याचे भालेराव म्हणाले. दरम्यान, विद्यापीठाच्या फंडातून नेमलेल्या प्राध्यापकांच्या नियुक्तीपोटी विद्यापीठाला दरमहा सुमारे २५ लाख रुपयांचा भुर्दंड बसत असल्याची माहिती मिळाली.