शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

‘अमृत’मयी सुरांचा अनोखा नजराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:17 IST

गायक, संगीतकार मिथुन शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, सुप्रसिद्ध गायक शान तसेच आजच्या तरुणांच्या ओठांवर ज्यांचे गीत असतात अशा तरुणाईला भुरळ घालणाºया अनेक गायकांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गायक, संगीतकार मिथुन शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, सुप्रसिद्ध गायक शान तसेच आजच्या तरुणांच्या ओठांवर ज्यांचे गीत असतात अशा तरुणाईला भुरळ घालणाºया अनेक गायकांचा कलाविष्कार रसिकांना बुधवारी सायंकाळी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात अनुभवायला मिळाला. यानिमित्ताने औरंगाबादकरांनी आकर्षक रोषणाईने सजलेल्या ‘लाइव्ह म्युझिकल क ॉन्सर्ट’चा आस्वाद घेतला.एमजीएम, शहर पोलिसांतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकºयांची मुले, कॅन्सरग्रस्त आणि पोलीस कर्मचाºयांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यासाठी चॅरिटी शोचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अमृता फडणवीस, अभिनेत्री अमिषा पटेल, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, एमजीएम संस्थेचे अंकुशराव कदम, आयकर विभागाचे श्रीवास्तव, माजी उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त डॉ. दीपाली घाटगे, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मिथुन यांनी ‘तुम ही हो...’ या तरुणाईला वेड लावणाºया गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गायक अल्तमाश फरिदी यांनी ‘हम जो हर मौसम पे..’ हे गीत गाऊन रसिकांची दाद मिळविली. गायिका जोनेता गांधी हिने ‘ये कसूर मेरा है’ हे गीत गात रंगमंचावर प्रवेश केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मोहम्मद इरफान यांनी गायलेले ‘दिल मेरा है नासमझ कितना’ हे गाणेही रसिकांना विशेष आवडून गेले. शरद कपूर, गजेंद्र वर्मा, युविका चौधरी, पलक मचल, बालकलाकार हर्षालीनेही कलाविष्कार दाखविला. समारोप मदन मोहन यांच्या ‘लगजा गले के फिर...’ या सदाबहार गाण्याने झाला. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, लोकमत सखी मंचच्या आशू दर्डा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.