शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वरचैतन्य’मधून सप्तसुरांचा अनोखा साक्षात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:38 IST

पारंपरिक ठुमरी व गझल आणि वाद्यसंगीताच्या फ्युजनची मेजवानी देण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे नवचैतन्य! अशा या नवचैतन्यपूर्ण आनंदोत्सवात औरंगाबादकरांना नव्या युगातील कविता, पारंपरिक ठुमरी व गझल आणि वाद्यसंगीताच्या फ्युजनची मेजवानी देण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. दिशा ग्रूप प्रस्तुत लोकमत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाटमध्ये यंदा प्रसिद्ध नाट्यकलावंत व कवी मकरंद देशपांडे, डॉ. पं. अजय पोहनकर, अभिजित पोहनकर या अद्वितीय त्रिकुटाच्या काव्य मैफिलीचा आनंद घेता येणार आहे.लोकमत भवनच्या हिरवळीवर २० आॅक्टोबर रोजी पाडव्याच्या मंगलमयी वातावरणात सकाळी ६ वाजता देशपांडे यांचे काव्यवाचन, पं. पोहनकर यांचे मन तृप्त करणा-या स्वरात पारंपरिक ठुमरी आणि गझल गायन आणि अभिजित पोहनकर यांचे की बोर्ड, गिटार, बासरी आणि तबला वादनाचे फ्युजन असा त्रिवेणी संगम ऐकण्याचा योग यानिमित्त जुळून आला आहे.पारंपरिक गायकी आणि नवतरुणांना साद घालणारा फ्युजनचा प्रकार व त्यात अर्थपूर्ण काव्यसरींची बरसात म्हणजे कमालच! आबालवृद्धांना आकर्षित करणारी ही मैफल औरंगाबादकरांसाठी अविस्मरणीय ठरणार यात काही शंका नसावी. लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘स्वरचैतन्य’ या सूरमयी कार्यक्रमाचे ‘दिशा गु्रप’ प्रमुख प्रायोजक आहेत, तर ‘भाग्यविजय’ आणि ‘लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल’ सहप्रायोजक आहेत. तसेच डेकोरेशन पार्टनर ‘महावीर डेकोरेटर’ तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘अगत्य केटरर्स’ आहेत. चला तर मग पहाटेच्या गुलाबी थंडीत चमचमीत फराळाच्या आस्वादासोबत काव्य, स्वर आणि संगीताचीही मेजवानी अनुभवयाला तयार राहा.