शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश योजना गुगलवर

By admin | Updated: June 26, 2017 23:39 IST

हिंगोली : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाची माहिती आता मुख्याध्यापकांना गुगलफॉर्मवर आॅनलाईन प्रद्धतीने भरून द्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाची माहिती आता मुख्याध्यापकांना गुगलफॉर्मवर आॅनलाईन प्रद्धतीने भरून द्यावी लागणार आहे. सर्व शिक्षा अभियानच्या संबंधित संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांच्या गणवेशाची व इतर शालेय माहिती भरून सदर अहवाल मुंबई येथे सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास एकूण ७० हजारांच्या वर मुला-मुलींना मोफत गणवेश वाटप करायचे आहेत. यावर्षीपासून आता गणवेशासाठी लागलेला खर्च विद्यार्थी - पालक यांच्या जार्इंट बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. परंतु शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळाले नाहीत. त्यानंतर शिक्षण विभागाने उर्वरित रकमेतून गणवेश खरेदीच्या सूचना दिल्या होत्या. परंतु नेमका कुठल्या शिल्लक रक्कमेतून खर्च करायचा आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक मुख्याध्यापकांची कोंडी झाली होती. काही विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नाहीत.विशेष म्हणजे, आतापर्यंत किती शाळांनी शिक्षण विभागाच्या शिल्लक रक्कमेतून गणवेश खरेदी केले आहेत. याबाबत गुगलफार्मवर माहिती भरून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. शिवाय यासंदर्भात सर्व शिक्षा अभियानकडून संबंधित गशिअ व मुख्याध्यापकांना कळविले. मात्र केवळ मोजक्याच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहेत. ज्यांनी पात्र विद्यार्थ्यांची माहिती गुगलफॉर्मवर भरली नाही, त्यांना रक्कम मिळणार नाही. असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. अनेक शाळांत तर इतर योजनांतील निधीच शिल्लक नाही. त्यामुळे अशा शाळांत तर गणवेश कुणाला मिळालाच नाही. मात्र या नव्या फंड्यामुळे पुन्हा गणवेश खरेदी प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.