शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:03 IST

सिल्लोड : औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील डोंगरगाव फाट्याजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. यात ...

सिल्लोड : औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील डोंगरगाव फाट्याजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटीत मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुल अशोक आडगावकर (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर काशिनाथ भोंबे (३२, रा. आडगाव भोंबे, ता. भोकरदन) यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.

अतुल व काशिनाथ हे दुचाकीवरून गावाकडे (आडगाव भोंबे) जात होते. डोंगरगाव फाट्याजवळ दुचाकीस्वारांना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघेही गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविले.

अतुल आडगावकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर काशिनाथ भोंबेंवर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे करीत आहेत.

-------

गुन्हे दाखल होऊनही परिणाम नाही

औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे अपघात सत्र सुरूच आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादचे दोन भाऊ अपघातात ठार झाले होते. यानंतर मृतांच्या वडिलांच्या तक्रारीवरून जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदार व अभियंत्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तरी त्याचा काही परिणाम झालेला नसून, रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. आणखी किती बळी घेतल्यावर संबंधित यंत्रणा जागी होणार हे मात्र देवच जाणे.