शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’ला पैसे नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:15 IST

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रेल्वेस्टेशन भागात जलवाहिन्या टाकण्यासाठी ७ कोटी ८० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी मनपाकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रेल्वेस्टेशन भागात जलवाहिन्या टाकण्यासाठी ७ कोटी ८० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी मनपाकडे केली. मनपा अधिकाऱ्यांनीही डोळेबंद करून हा प्रस्ताव गुरुवारी सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला. महापौर व आयुक्त वगळता एकाही नगरसेवकाने या ठरावाच्या बाजूने मत व्यक्त केले नाही. कंत्राटदाराची आणि प्रकल्प सल्लागार समितीची ही ‘गटारगंगा’आम्ही साफ करणार नाही, असा सूर नगरसेवकांचा होता. त्यामुळे कंत्राटदाराला देण्यात येणाऱ्या वाढीव रकमेचा ठराव तूर्त स्थगित करण्यात आला.रेल्वेस्टेशन भागात भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराला मोठ्या ड्रेनेजलाइन टाकायच्या आहेत. पूर्वी या कामासाठी फक्त ३ कोटींचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. आता याच कामासाठी कंत्राटदाराने ७ कोटी ८० लाख रुपयांची मागणी केली आहे. गुरुवारी सर्वसाधारण सभेत या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. योजनेचा प्रकल्प आराखडा तयार करताना प्रकल्प सल्लागार समितीच्या ही बाब निदर्शनास आली नाही का... घरी बसून डीपीआर तयार केला का... एक हजारवेळा मागणी करूनही योजनेचा आॅडिट रिपोर्ट प्रशासन का देत नाही... कंत्राटदाराची बिले थांबवा असे आदेश देऊनही बिले दिल्या जातात...असे एक ना अनेक प्रश्न नगरसेवक राजू वैद्य, राजगौरव वानखेडे, नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, कीर्ती शिंदे, समीना शेख, अफसर खान, भाऊसाहेब जगताप यांनी उपस्थित केले. प्रशासनातर्फे आयुक्त डी. एम. मुगळीकर, प्रभारी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी हे काम करणे किती आवश्यक आहे, योजना अर्धवट राहील आदी मुद्यांवर खुलासा केला. मात्र, एकाही नगरसेवकाचे यावर समाधान झाले नाही. अधिकारी कंत्राटदाराची वकिली मनपात करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ही लाइन टाकल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नसल्याचे आयुक्तांनी नमूद करताच सभेत आणखी भडका उडाला, अशा धमक्या देऊ नका, असा सज्जड दम राजू वैद्य यांनी भरला.