पूर्णा : शहरातील सेतू सुविधा कार्यालयाचा अनागोंदी कारभार चालत असून विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत आहे. पूर्णा तहसील कार्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी अनागोंदी कारभार चालू असल्यामुळे दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्रास होत आहे. सेतू सुविधा केंद्रामध्ये सुविधा नसल्यामुळे सर्वांनाच याचा त्रास होत आहे. दहावी व बारावीचे निकाल लागल्यामुळे तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये प्रमाणपत्र काढण्यासाठी शेकडो विद्यार्थी व पालक येत असून त्यांना कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी, पालक व शेतकरी वर्गास तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे. सेतू सुविधा केंद्रात केवळ एकच संगणक असल्यामुळे प्रमाणपत्र काढण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. या ठिकाणच्या संगणकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. सेतू सुविधा केंद्रामध्ये मूळ अर्जाची प्रत घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना दोन रुपयांच्या जागी दहा रुपये खर्च करावा लागत आहे. सुविधा केंद्राचे कर्मचारी रांगेतील विद्यार्थी व पालकांना त्रास देत असून कागदपत्रांसाठी जादा पैसे उकळत आहेत. या शिवाय फेरफार व सातबारासाठी जास्त पैसे घेण्यात येत आहेत. याप्रकरणी तहसीलदारांनी त्वरित लक्ष घालून सेतू सुविधा केंद्रातील सुविधा वाढवाव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपाचे शहराध्यक्ष विलास ठाकूर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कराड, मनसेचे प्रसाद पुरी व गोविंद ठाकूर यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)प्रमाणपत्रासाठी रांगा पूर्णा येथील सेतू सुविधा कार्यालयात प्रमाणपत्र काढण्याठी विद्यार्थी व पालकांच्या रांगा लागत आहेत़ दोन ते तीन तास रांगेत उभे राहून प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ सेतू सुविधा केंद्रातील कर्मचारी विद्यार्थ्यांकडून जाता पैसे घेऊन प्रमाणपत्र देत आहे़ यामुळे विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे़ यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होते असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़
सेतू सुविधा केंद्रात अनागोंदी कारभार
By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST