शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

उमरग्याचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरण पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळतीचे गृहण लागल्याने गेल्या १५ दिवसापासून उमरगा शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरण पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळतीचे गृहण लागल्याने गेल्या १५ दिवसापासून उमरगा शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. उमरगा शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. शहरात एकूण पाच हजारावर नळ कनेक्शन आहेत. शहराच्या वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याआधी कोळसूर, कोरेगाव, तुरोरी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. या पाणीपुरवठा योजना बंद करून पालिकेने गेल्या वर्षभरापासून २३ कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र माकणी धरण पाणीपुरवठा योजना सुरू केली. पाच हजारावर नळ कनेक्शन असलेल्या उमरगा शहराकडे सातत्याने पावसाने पाठ फिरविली असून दुसरीकडे विंधन विहिरी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खालावत चालली असून, पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मलंग प्लॉट, महात्मा बसवेश्वर विद्यालय, सांस्कृतिक सभागृह, हमीदनगर आदी भागात जलकुंभामार्फत टप्प्याटप्प्याने सात दिवसाआड एकवेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बँक कॉलनी, शिवपुरी, विष्णूपुरी, साईनगर, गणेशनगर, माने नगर, नंदनवन कॉलनी, एसटी कॉलनी या भागासह नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या नवीन नळधारकांसाठी नळाद्वारे पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. परंतु संपूर्ण शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)नियोजनाचा अभावउमरगा शहरासाठी माकणी धरणातून १५० अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीद्वारे वर्षभरापासून पाणीपुरवठा केला जात आहे. समुद्राळ येथे जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्ध करून पाईपलाईनद्वारे जलकुंभात सोडले जाते. जलकुंभाच्या वॉल्व्हवर वेळीच नियंत्रण नसल्याने दुसऱ्या जलकुंभापर्यंत पाणी जात असताना पाईपलाईनवर दाब पडून वारंवार गळती होत असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान शहराला पंधरा दिवसापासून तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बहुतांश लोकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. गळतीचे ग्रहणमाकणी ते समुद्राळ या १७ किमी अंतरात गेल्या दहा वर्षापूर्वी एक फुटी लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मध्यतंरीच्या कालावधीत या पाईपलाईनचा वापर नसल्याने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करताना या पाईपाला अनेक ठिकाणी मार लागला आहे.त्यामुळे १७ किमीच्या अंतरावर १०० ठिकाणापेक्षा जास्त गळतीच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. समुद्राळ, नागराळ येथे गळतीची नुकतीच दुरुस्त करण्यात आली आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर शनिवारी दत्तमंदिरानजीक व मोरे पेट्रोल पंपाजवळ या पाईपलाईनला पुन्हा गळती लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करताना तब्बल सव्वाशे वेळा पाईपलाईनच्या गळतीची दुरुस्ती करण्यात आली मात्र सातत्याने गळती होत असल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे.