शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

उमरग्यात भाजपाचे गायकवाड उपनगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 00:15 IST

उमरगा : उपनगराध्यक्षपदी भाजपचे हंसराज गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उमरगा : पालिकेच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या प्रेमलता टोपगे यांनी पदभार घेतल्यानंतर शुक्रवारी उपनगराध्यक्ष, निमंत्रित सदस्य व गटनेत्यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदी भाजपचे हंसराज गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उमरगा पालिकेच्या उपनगराध्यक्ष, निमंत्रित सदस्य व गटनेत्यांच्या निवडीसंदर्भात प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून हंसराज गायकवाड तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बालाजी पाटील व शिवसेनेकडून पंढरीनाथ कोणे यांचे अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या क्षणी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपचे गायकवाड व सेनेचे कोणे यांच्यात निवडीसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी सोळा मते भाजपचे हंसराज गायकवाड तर सात मते कोणे यांना मिळाली. संख्यबालानुसार गायकवाड यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी भाजपला तर राष्ट्रवादीने सेनेला मतदान केले. हे मतदान हात उंचावून घेण्यात आले. निमंत्रित सदस्यपदासाठी कॉंग्रेसकडून एम.ओ. पाटील, भाजपकडून अरुण इगवे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विशाल माने यांनी अर्ज दाखल केला होता. त्यात संख्याबळानुसार कॉंग्रेसकडून पाटील तर भाजपकडून इगवे यांची निवड करण्यात आली. तर तौलनिक संख्याबळ नसल्याने राष्ट्रवादीच्या विशाल मानेची निवड होऊ शकत नसल्याचे यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभागृहात सांगितले. पालिका गटनेतेपदी अतिक मुंशी कॉंग्रेस, गोविंद घोडके भाजप, संतोष सगर शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संजय पवार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा टोपगे यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे सदस्य महेश माशाळकर, वशिम शेख, विक्रम मस्के, ललिता सरपे, संगीता औरादे, सविता वाघमारे, जमिलाबानू बेग, शिल्पा शिंदे, सुनंदा वरवटे, राजेश्वरी स्वामी, अनूसया नागदे, इराप्पा घोडके, पंढरीनाथ कोणे, जयश्री चव्हाण, प्रतिभा चव्हाण, रुबिना अत्तार यांच्यासह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, संताजी चालुक्य, माधव पवार, शौकत पटेल, सतीश साळुंके उपस्थित होते. (वार्ताहर)