शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

उमरग्यात विराट मराठा मोर्चा

By admin | Updated: January 17, 2017 00:17 IST

उमरगा : विविध मागण्यांसाठी सोमवारी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चा काढण्यात आला़

उमरगा : मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला हमीभाव द्यावा आदी विविध न्याय मागण्यांसाठी सोमवारी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चा काढण्यात आला़ या मूक मोर्चात तालुक्यासह सीमावर्ती भागातील, मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विशेषत: यात महिला- मुलींची संख्याही लक्षणीय होती़स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवावा, शासकीय प्रकल्पांसाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा तत्काळ देऊन त्यांना उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात भागीदार करावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मराठा समाजातील मुला-मुलींच्या उच्चशिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीपंपाचा विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा, उमरगा शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठा समाजबांधवांचा महाराष्ट्रात समावेश करावा, उमरगा शहराचे नाव धाराशिव, असे करावे, गुंजोटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशासनाने हटविलेला पुतळा तत्काळ बसवावा आदी मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला़ सोमवारी सकाळपासूनच शहरात समाजबांधव हातात भगवे झेंडे घेवून शहरात दाखल होत होते़ राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडून येणाऱ्या गावातील मोर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी काळा मारुती मंदीर, आदर्श महाविद्यालय या ठिकाणी वाहनतळांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पश्चिमेकडून येणाऱ्या विविध गावातील मोर्चेकऱ्यांसाठी गंधर्व हॉटेल मैदान, दत्त कॉलनी, शिंदे मंगल कार्यालय ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.शहरातील दत्त मंदीर परिसरातून मोर्चास सोमवारी दुपारी १२़१५ वाजता सुमारास प्रारंभ झाला. दत्त मंदिरपासून थेट छत्रपती शिवाजी विद्यालयापर्यंत महिलांची स्वतंत्र रांग होती. मोर्चात उमरगा, लोहारा तालुक्यातील व कर्नाटक सीमावर्ती भागातील सकल मराठा समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या मोर्चात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहभागी झाले होते़ मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांसाठी मुस्लीम समाजबांधवांनी मोर्चाच्या मार्गावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केली होती़ (वार्ताहर)