शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव घाटाजवळ लूटमारीचा प्रकार

By admin | Updated: March 20, 2016 00:45 IST

येरमाळा : प्रवाशी म्हणून जीपमध्ये घेतलेल्या दोघांना शिवीगाळ, मारहाण करून ४२ हजार रुपये घेवून चोरट्यांनी लूटमार केली़

येरमाळा : प्रवाशी म्हणून जीपमध्ये घेतलेल्या दोघांना शिवीगाळ, मारहाण करून ४२ हजार रुपये घेवून चोरट्यांनी लूटमार केली़ ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास येरमाळा चौरस्ता ते नांदगाव घाटादरम्यान घडली असून, या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील हिंगणी येथील उत्तम उर्फ नाना गौतम जाधव हे गुरूवारी रात्रीच्या सुमारास पाहुण्यासह येरमाळा (ताक़ळंब) येथील चौरस्त्यावर थांबले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या एका जीप चालकाने त्यांना कुठे जायचे आहे ? असे विचारले़ त्यावेळी उत्तम जाधव यांनी नगरला जायचे आहे, असे सांगितल्यानंतर त्यांना जीपमध्ये बसविण्यात आले़ जीप येरमाळा चौरस्ता ते नांदगाव घाटादरम्यान जात असताना उत्तम जाधव यांना मारहाण, शिवीगाळ करीत त्यांच्याकडील रोख ४२ हजार रूपये व मोबाईलची बॅटरी काढून घेतली़ नांदगावच्या पुढे जाधव यांना सोडून चोरटे घटनास्थळावरून फरार झाले़ याबाबत उत्तम जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जिरगे हे करीत आहेत़ या घटनेने येरमाळ्यासह परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)